Realme Watch T1 लॉन्च, ग्राहकांना मिळणार AMOLED डिस्प्लेसह 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप
Realme Watch T1 (Photo Credits-Twitter)

Realme Watch T1 स्मार्टवॉच चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या वॉचमध्ये गोल आकाराची डायल आणि ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा दिली गेली आहे. ऐवढेच नव्हे तर हार्ट रेट आणि SpO2 सेंसर दिले गेले आहे. या व्यतिरिक्त युजर्सला रिअलमी वॉच टी1 मध्ये 110 स्पोर्ट्स मोड आणि 50 हून अधिक वॉच फेस मिळणार आहेत. तर जाणून घ्या स्मार्टवॉचच्या स्पेसिफिकेशनसह किंमतीबद्दल अधिक.(Paytm Cashback Dhamaka: पेटीएमची कॅशबॅक ऑफर; दररोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी)

या स्मार्टवॉचमध्ये 1.3 इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. याचे रेजॉल्यूशन 416X416 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 50Hz आहे. यामध्ये स्क्रिनच्या सुरक्षिततेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचा सपोर्ट दिला गेला आहे. युजर्सला वॉचच्या माध्यमातून कॉलिंग करता येणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टवॉचमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0, जीपीएस, ग्लोनेस आणि एनएफसी मिळणार आहे.

रिअलमीच्या नव्या स्मार्टवॉचमध्ये 4GB चा ऑनबोर्ड स्टोरेज दिला गेला आहे. तसेच ऑफलाइन प्लेबॅकचा सपोर्ट दिला जाणार आहे. त्याचसोबत accelerometer, ambient light, gyroscope आणि geomagnetic सेंसर मिळणार आहे. रिअलमी वॉच टी1 मध्ये 228mAh ची बॅटरी दिली आहे. याची बॅटरी सिंगल चार्जमध्ये 7 दिवसांपर्यंत बॅकअप देणार आहे.(Samsung Galaxy A52s 5G चे Awesome Mint कलर व्हेरिएंट भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत)

कंपनीच्या या नव्या स्मार्टवॉचची किंमत 699 चीनी युआन म्हणजेच 8200 रुपये आहे. हे वॉच ब्लॅक, मिंट आणि Olive ग्रीनमध्ये कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्टवॉच भारतात कधी लॉन्च केले जाणार याबद्दल कळलेले नाही.