Paytm Cashback Dhamaka (Photo Credits: Twitter)

पेटीएम (Paytm) ने सणासुदीच्या काळात युजर्ससाठी नवी कॅशबॅक ऑफर (Cashback Offer) सादर केली आहे, ‘पेटीएम कॅशबॅक धमाका’ (Paytm Cashback Dhamaka) असे या ऑफरचे नाव असून याअंतर्गत दररोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी मिळत आहे. खरंतर ही मार्केटींग मोहिम असून यासाठी पेटीएम 100 कोटी रुपये खर्च करणार आहे. भारतात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएम यूपीआयबद्दल जागरूक करणे, हा या मोहिमेमागील उद्देश आहे. तसंच सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षक कॅशबॅक आणि रिव्हार्ड्स देण्यासाठी ही ऑफर लॉन्च करण्यात आली आहे.

सध्याच्या सणासुदीच्या काळात 10 भाग्यवान विजेत्यांना दररोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. 10,000 विजेत्यांना 100 रुपये कॅशबॅक मिळेल, तर आणखी 10,000 वापरकर्त्यांना 50 रुपये कॅशबॅक मिळेल. दिवाळीच्या सुमारास युजर्स दररोज 10 लाख रुपये जिंकू शकतात. मोबाईल, ब्रॉडबँड डीटीएच रिचार्ज, बिल पेमेंट, मनी ट्रान्सफर, ट्रॅव्हल तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्ड बिल पेमेंट, मूव्ही तिकीट बुकिंग, फास्टॅग पेमेंट, ऑनलाईन आणि ऑफलाइन किराणा स्टोअर व्यवहार इत्यादींसाठी पेटीएमचा वापर केल्यास कॅशबॅक दिला जाईल. त्याचबरोबर दिवाळीच्या आसपास पेटीएममधून बिल पेमेंट किंवा पैसे ट्रान्सफर केल्यास कॅशबॅक मिळेल.

युजर्संना आयफोन 13, टी 20 विश्वचषक तिकीटे, लीफ हेडफोन सारख्या ब्रँडचे शॉपिंग व्हाऊचर आणि बक्षिसे जिंकण्याची संधी देखील मिळेल. ही ऑफर कंपनीने सादर केलेल्या सर्व प्रमुख पेमेंट पर्यायांद्वारे लागू आहे - पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, पेटीएम पोस्टपेड, क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड. (आता FASTag च्या माध्यामातून मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm सुरु करणार नवी सेवा)

दरम्यान, ही मोहिम 14 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या मोहिमेअंतर्गत कंपनी विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकसारख्या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.