सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी (Samsung Galaxy A52s 5G) चे Awesome Mint कलर वेरिएंट भारतात लॉन्च झाले आहे. परंतु, हा कलर केवळ 8जीबी रॅम+256जीबी स्टोरेज मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. यात इतर तीन शेड्स देखील उपलब्ध आहेत- Awesome Black, Awesome Purple आणि Awesome White. दरम्यान, हा स्मार्टफोन मागील महिन्यातच लॉन्च करण्यात आला होता. याच्या 8जीबी+256जीबी वेरिएंटची किंमत 37,999 रुपये आणि 6जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 35,999 रुपये इतकी आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड (HDFC Bank Credit Card) किंवा डेबिट कार्ड (Debit Card) वरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 6000 रुपयांचा इन्स्टट कॅशबॅक मिळत आहे.
Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+सुपर AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सह देण्यात आला आहे. यात Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर 8जीबी रॅम+256जीबी इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे. (Samsung Galaxy F12 आणि Galaxy M12 च्या किंमतीत वाढ; काय आहेत New Prices? जाणून घ्या)
यात 64MP चा मेन कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा वाईल्ड एंगल लेन्स आणि 5MP सेन्सर्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. यात कनेक्टीव्हीटीसाठी Wi-Fi, Bluetooth, GPS/ A-GPS, 5G, 4G LTE देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन मध्ये IP67 certified dust, वॉटर-रेजिस्टंट आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.