Realme V15 स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, काय असू शकतात याची खास वैशिष्ट्ये?
Realme V15 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी (Realme) लवकरच भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन रियलमी सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असेल. Realme V15 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच होईल. चीन बाजाराता हा स्मार्टफोन 7 जानेवारीला लाँच करण्यात आला आहे.  किंमतीच्या तुलनेत यात जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. याचे मुख्य आकर्षण म्हणजे यात MediaTekDimensity 800U SoC आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह चीन बाजारात लाँच करण्यात आला आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनची किंमत 21,000 रुपये असू शकते. या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 6.4 इंचाची सुपर अमोल्ड डिस्प्ले असू शकते. त्याचबरोबर यात MediaTek Dimensity 800U चिपसेट दिला आहे. हाा 5G मॉडेमसह येतो.

हेदेखील वाचा- Realme X50 Pro 5G स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घट; जाणून नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Realme V15 च्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 64MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर 8MP चा वाइड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो लेन्स दिला आहे. तसेच या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमे-यासाठी पंच होल दिला आहे. यात व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16MP चा कॅमेरा सेंसर दिला आहे.

या स्मार्टफोनच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 4K व्हिडिओ रेकॉर्डंग, UIS Max (अल्ट्रा इमेज स्टेबलायजेशन) आणि 120 फ्रेम पर सेकंद 1080p स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड होतो. त्याचबरोबर यात 4310mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 50W फास्ट चार्ज रिपोर्टसह येतो.

दरम्यान Realme X50 Pro 5G च्या किंमतीत 10,000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या स्मार्टफोनचे 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 31,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 41,999 रुपये आहे. आता वापरकर्ते 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज मॉडेल 47,999 रुपयांऐवजी केवळ 37,999 रुपयात खरेदी करण्यास सक्षम असतील. हा स्मार्टफोन मोस ग्रीन आणि रस्ट रेड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.