Realme X50 Pro 5G: सध्या बाजारात 2 जी, 3 जी आणि 4 जी नंतर 5 जी स्मार्टफोनची क्रेझ वाढत आहे. 5 जी सपोर्ट असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत जास्त असली तरी काही दिवसातचं या फोनची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर 5 जी स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण Realme X50 Pro 5G ची किंमत थेट 10,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन विकत घेण्याची ही चांगली संधी आहे. वापरकर्ते कमी किंमतीत हा स्मार्टफोन विकत घेऊ शकतात.
Realme X50 Pro 5G जी हा कंपनीचाचं नव्हे तर भारताचा पहिला 5 जी स्मार्टफोन आहे. सध्या हा स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्येही लोकप्रिय आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्याची घोषणा केली आहे. कंपनीने अधिकृत संकेतस्थळ आणि ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Realme X50 Pro 5G स्मार्टफोन नवीन किंमतीसह विक्रीसाठी उपलब्ध असल्याचेही म्हटलं आहे. (Xiaomi चा नवा स्मार्टफोन Redmi Note 9T 5G ची लाँचिंग डेट आली समोर, 'ही' असू शकतात या मोबाईलची खास वैशिष्ट्ये)
Realme X50 Pro 5G ची नवीन किंमत -
Realme X50 Pro 5G च्या किंमतीत 10,000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या स्मार्टफोनचे 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 31,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 41,999 रुपये आहे. आता वापरकर्ते 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज मॉडेल 47,999 रुपयांऐवजी केवळ 37,999 रुपयात खरेदी करण्यास सक्षम असतील. हा स्मार्टफोन मोस ग्रीन आणि रस्ट रेड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Realme X50 Pro 5G ची खास वैशिष्ट्ये -
Realme X50 Pro 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर वर सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर कार्य करतो. यात पावर बॅकअपसाठी 65 सुपरडाटा फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,200 एमएएच बॅटरी आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा ड्युअल पंच होल डिस्प्ले आणि क्वाड रीअर कॅमेरा सेटअप आहे. फोनचा प्राथमिक कॅमेरा 64 एमपीचा आहे, तर 12 एमपीचा टेलिफोटो लेन्स, 8 एमपी अल्ट्रा वाईड लेन्स आणि बी अँडडब्ल्यू लेन्स देण्यात आला आहे. त्याच वेळी, यात ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे. जो 32 एमपी प्राइमरी लेन्स आणि 8 अल्ट्रा वाइड एंगलसह सुसज्ज आहे.