Realme Sale 2020 ला आजपासून सुरुवात; 5 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार जबरदस्त Discount
Realme 3 First Sale will start today (Photo Credits- Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी ने 'Realme 2020 Sale' ची घोषणा केली आहे. या सेलला आजपासून सुरुवात झाली असून 5 जानेवारी पर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. या सेलमध्ये रियलमी च्या जबरदस्त स्मार्टफोन्सवर भन्नाट ऑफर्स मिळणार आहेत. नवीन वर्षातील रियलमी चा पहिला वहिला आणि बंपर सेल आहे असे म्हणायला हरकत नाही. हा सेलमध्ये स्मार्टफोन्सवर 30 ते 40 टक्क्यांची सूट मिळणार आहे. ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर हा सेल सुरु झाला आहे. यात नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला जात आहे.

डिस्काउंट मध्ये रियलमी 3 प्रो, रियलमी 5 प्रो, रियलमी एक्स, रियलमी 3आय सारख्या अनेक फोन्सचा समावेश आहे.

Realme 3 Pro

या स्मार्टफोनवर 3000 पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. 4GB, 6GB आणि 128GB रॅम असलेल्या Realme 3 Pro स्मार्टफोन अनुक्रमे 9,999 रुपये, 11,999 रुपये आणि 12,999 रुपयांना मिळत आहे.

Realme X

या स्मार्टफोनवर 2000 पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. याच्या 4GB आणि 8GB रॅम स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 14,999 रुपये आणि 17,99 रुपये आहे.

हेदेखील वाचा- Airtel कंपनीकडून ग्राहकांना झटका, टॅरिफ प्लॅनच्या दरात पुन्हा वाढ

Realme 3i

या स्मार्टफोनवर 2000 पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. 4GB रॅमचा Realme 3i 7,999 रुपयात मिळत आहे.

Realme 5 Pro

या स्मार्टफोनवर 1000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. 4GB, 6GB आणि 8GB रॅमचा स्मार्टफोन अनुक्रमे 12,999, 13,999, 15,999 रुपयांना मिळत आहे.

Realme C2

या स्मार्टफोनवर 500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. हा फोन 5,999 रुपयांत मिळत आहे.

हा भन्नाट सेल 5 जानेवारी 2020 पर्यंत जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा असे सांगण्यात येत आहे.