Realme Narzo Smartphone (Photo Credits: Realme India)

स्मार्टफोन ब्रँन्ड Realme ने काही दिवसांपूर्वीच त्यांचा Realme Narzo 30 4G मलेशियात लॉन्च केला होता. आता कंपनी या स्मार्टफोनसह त्याचे 5G वेरियंट भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. याबद्दलची माहिती CEO माधव सेठ यांनी दिली आहे. दरम्यान, कंपनीकडून अद्याप आगामी Realme Narzo 30 आणि 5G वेरियंटची लॉन्चिंग तारीख, किंमत किंवा फिचर्स बद्दल कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. रिअलमीचे सीईओ माधव सेठ यांच्या मते, रिअलमी नार्जो 30 आणि रिअलमी नार्जो 30 5G भारतात या महिन्याच्या अखेर पर्यंत लॉन्च केला जाऊ शकतो.

कंपनीने रिअलमी नार्जो 30 ची किंमत मलेशियात RM 799 म्हणजेच 14,150 रुपये ठेवली आहे. या किंमतीत 6GB रॅम+128GB स्टोरेज मिळणार आहे. तर याच्या 5G वेरियंटसाठी युरोपात 189 युरो म्हणजे 16,800 रुपये किंमत आहे. अशी अपेक्षा आहे की, 4G आणि 5G वेरियंटची किंमत भारतात 16 हजार रुपये ते 20 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते.(Poco M3 Pro 5G च्या ऑनलाईन सेलला Flipkart वर सुरुवात; येथे पहा ऑफर्स)

Realme Narzo 30  मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रेज्यॉल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz असून यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ऑक्टा कोर MediaTek Helio G95 प्रोसेसर दिला आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरज मिळणार आहे.  तसेच युजर्सला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 48MP चा प्रायमरी सेंसर, 2MP चा ब्लॅक अॅन्ड व्हाइट लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळणार आहे. या व्यतिरिक्त फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे.

फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. ही बॅटरी 30W डार्ट चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि युएसबी पोर्ट सारखे फिचर्स दिले आहेत.