Poco M3 Pro 5G च्या ऑनलाईन सेलला Flipkart वर सुरुवात; येथे पहा ऑफर्स
Poco M3 Pro 5G Smartphone (Photo Credits: Poco Global)

पोको एम3 प्रो 5जी (Poco M3 Pro 5G) हा स्मार्टफोन भारतात ऑनलाईन सेलसाठी उपलब्ध झाला आहे. मागील आठवड्यात हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला होता आणि आता त्याचा ऑनलाईन सेल फ्लिपकार्ट (Flipkart) वर सुरु झाला आहे. या सेल अंतर्गत एसबीआय क्रेडिट कार्ड (SBI Credit Card) आणि क्रेडिट कार्ड ईएमआय (Credit Card EMI) वरुन खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काऊंट मिळेल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड (Flipkart Axis Bank Credit Card) वरुन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. फ्लिपकार्ट पे लेटरचा (Flipkart Pay Later) वापर केल्यास 100 रुपये डिस्काऊंट मिळेल आणि त्यासोबत एक्सचेंज डिल्स अंतर्गत 12,950 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळू शकतो.

Poco M3 Pro 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ पंचहोल डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. यात MediaTek Dimensity 700 SoC प्रोसेसर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे. (Poco M3 Pro 5G स्मार्टफोन 'या' दिवशी झाला भारतात लाँच; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये)

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून 48MP चा मेन कॅमेरा, 2MP चा मायक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा स्नॅपर देण्यात आला आहे.

Poco M3 Pro 5G (Photo Credits: Poco)

Poco M3 Pro 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्गिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी NFC, dual-band Wi-Fi, Bluetooth v5.1, GPS, 3.5mm audio jack, USB Type-C port आणि 5G हे पर्याय देण्यात आले आहेत. त्याचबरोबर accelerometer, gyroscope, electronic compass, IR blaster आणि फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

Poco M3 Pro 5G (Photo Credits: Poco)

Poco M3 Pro 5G च्या 4जीबी+64जीबी वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आणि 6जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. मात्र आजच्या दिवशी 4जीबी वेरिएंट 13,499 रुपयांना आणि 6जीबी वेरिएंट 15,499 रुपयांना मिळत आहे.