Poco M3 Pro 5G स्मार्टफोन 'या' दिवशी होणार भारतात लाँच, काय असू शकतात याची खास वैशिष्ट्ये?
Poco M3 Pro 5G (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी पोको (Poco) लवकरच आपला नवा स्मार्टफोन Poco M3 Pro 5G भारतात लाँच होणार आहे. पोको कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटरवर पेजवर याबाबत माहिती दिली आहे. येत्या 8 जूनला हा फोन भारतात लाँच होणार आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) या फोनचे पेज लाइव करण्यात आले आहे. याचाच अर्थ लाँच झाल्यानंतर हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा पोकोचा भारतात लाँच होणारा पहिला 5G स्मार्टफोन असेल. हा स्मार्टफोन अन्य ब्रँडच्या 5G स्मार्टफोन्सला तगडी टक्कर देईल.

Poco M3 Pro 5G स्मार्टफोन 4GB+64GB आणि 6GB + 128GB अशा दोन वेरियंटमध्ये लाँच केला जाईल. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 90Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन आणि 48MP चा बॅक कॅमेरा असेल.हेदेखील वाचा- Google Photos Unlimited Free Storage आज 1जूनपासून संपलं; पहा आता त्याला पर्यायी उत्तम Cloud Storage Plans कोणते?

Poco M3 Pro 5G च्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाची FHD+ LCD डॉट डिस्प्ले असू शकते. यात 1100 निट्स पीक ब्राइटनेस आणि 90Hz Dynamic Switch रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याशिवाय फोनमध्ये 2MP चा डेप्थ सेंसर आहे आणि 2MP चे मॅक्रो लेन्स आहे. त्याचबरोबर यात 8MP चा सेल्फी कॅमेरा देखील आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18Wची फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Poco M3 Pro 5G मध्ये फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आहे. IR ब्लास्टर आहे, NFC आहे. त्याचबरोबर Hi-Resolution ऑडियो सपोर्ट आहे. त्याचबरोबर यात बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.