रियलमीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आज दुपारी 12 वाजता ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) Realme Narzo 10 चा ऑनलाईन सेल सुरु होणार आहेय त्यामुळे इच्छुकांना हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल त्यांसाठी आज चांगली संधी आहे असे म्हणायला हरकत नाही. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मे मध्ये लाँच झालेल्या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त स्टोरेज फिचर आणि कॅमेरा फिचर देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन निळा, पांढरा आणि हिरव्या अशा 3 वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे.
या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले 89.8 टक्के स्क्रिन टू बॉडी रेशियोसह देण्यात आला आहे. स्मार्टफोनसाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच ही दिला असून दममदार परफॉर्मससाठी MediaTek Helio G80 चिपसेटसह येणार आहे. Realme Narzo 10 स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- Realme Narzo 10 आणि Narzo 10A भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि धमाकेदार फिचर्स
या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. गेमिंगसाठी हा दमदार ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 10 वर चालेल. यात ऑक्टाकोर मिडियाटेक हेलिओ G80 प्रोसेसर मिळतो.
या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि प्रायमरी सेंसर व्यतिरिक्त यामध्ये 119 डिग्री अल्ट्रा-वाइड लेंसर, पोट्रेट लेंस आणि मॅक्रो लेंस देण्यात आल्या आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. त्यासोबतच यात 5000mAh ची बॅटरी चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.