रियअलमी (Realme) कडून आज भारतात Narzo सीरिजच मधील दोन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनीने ही सीरिज तरुणांना टार्गेट करुन रोलआउट केली असून हे स्मार्टफोन ऑनलाईन इव्हेंटमध्ये झळकवण्यात आले होते. रिलअलमीकडून Narzo 10 आणि Narzo 10A हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले असून सर्वांच्या शिखाला परवडणारे आहेत. दमदार बॅटरी ते शानदार कॅमेरा असे विविध फिचर्स यामध्ये युजर्सला मिळणार आहेत. Narzo 10A साठी रियर पॅनलवर मोठा कंपनीचा लोगो सुद्धा देण्यात आला आहे. तर Narzo 10 एका खास डिझाइनमध्ये येणार आहे.
रियअमली नारझो 10 स्मार्टफोन ग्राहकांना 11,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. यामध्ये 4जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. रिअलमी नारझो 10A स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह येणार असून ग्राहकांना त्यासाठी 8,499 रुपये मोजावे लागणार आहेत. नारझो 10A स्मार्टफोन सी ब्लू आणि पांढऱ्या रंगात उतरवण्यात आला आहे. तर रिअलमी नारझो 10 ग्रीन आणि सफेद रंगात ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.(Xiaomi कंपनीने लॉन्च केला 108MP कॅमेरा असलेला Mi10 स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)
>>Realme Narzo 10 फिचर्स
नव्या Realme Narzo 10 मध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले 89.8 टक्के स्क्रिन टू बॉडी रेशियोसह देण्यात आला आहे. स्मार्टफोनसाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच ही दिला असून दममदार परफॉर्मससाठी MediaTek Helio G80 चिपसेटसह येणार आहे. यामध्ये दोन रॅम ऑप्शन 3 जीबी आणि 4 जीबी देण्यात आला आहे. फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणार आहे. गेमिंगसाठी हा दमदार ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास त्यामध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि प्रायमरी सेंसर व्यतिरिक्त यामध्ये 119 डिग्री अल्ट्रा-वाइड लेंसर, पोट्रेट लेंस आणि मॅक्रो लेंस देण्यात आल्या आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये 5000mAh ची बॅटरी रिवर्स चार्जिंग सपोर्टसह दिली आहे.
>>Realme Narzo 10A फिचर्स
रिलअलमी Realme Narzo 10A स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला असून तो MediaTek Helio G70 चिपसेटसह मिळणार आहे. फोनच्या रियर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. मिनी- ड्रॉप फुलस्क्रिन ही देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये हाय ग्राफिक PUBG गेम युजर्सला खेळता येणार आहे. स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या 5000mAh बॅटरीच्या मदतीने 43 तासांपेक्षा अधिक टॉकटाइम मिळणार आहे.(Facebook Desktop App साठी सुरु केले नवे Dark Mode फिचर; 'या' सोप्प्या स्टेप्स वापरून तुमच्या डेस्कटॉप वर करा सुरु)
स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यामध्ये प्रायमरी सेंसर 12 मेगापिक्सल असून दुसरा पोट्रेट आणि तीसरा मॅक्रो सेंसरवाला आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, याच्या मदतीने लो-लाइटमध्ये उत्तम फोटोग्राफी करता येणार आहे. कॅमेरामध्ये अल्ट्रा मॅक्रो, पोट्रेट मोड आणि एचडीआर मोड व्यतिरिक्त 4X झूम मिळणार आहे. तसेच क्रोमा बूस्ट फिचर सुद्धा देण्यात आले आहे. सेल्फीसाठी यामध्ये 5 मेगापिक्सल कॅमेरा AI सपोर्टसह दिला आहे.