Realme C3 भारतात लाँच, दमदार बॅटरी लाईफ असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये
Realme C3 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी ने आपला नवीन स्मार्टफोन Realme C3 आज भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये जबरदस्त बॅटरी लाईफ आणि कॅमेरा फिचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये लेटेस्ट प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा सपोर्ट मिळणार आहे. Realme C3 स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत साइटवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. 14 फेब्रुवारीपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन 7,999 रुपयात विकला जाणार आहे.

हा स्मार्टफोन 2 पर्यायात लाँच करण्यात आला आहे. ज्यात 3GB रॅम आणि 32GB चे स्टोरेज तसेच 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे. यातील 3GB रॅमच्या फोनची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली असून 4GB रॅम असलेला स्मार्टफोन 7,999 रुपयांत विकला जाणार आहे.

रियलमी 3 या फोनच्या खरेदीवर जिओकडून 7,550 रुपयांचा फायदा मिळणार आहे. Realme C3 स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. हे वॉटरड्रॉप स्टाइल नॉच सह आहे. या डिस्प्लेचा स्क्रीन -टू-बॉडी Ratio 89:8% आहे. सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात येणार आहे.

हेदेखील वाचा- दमदार फिचर्स आणि उत्कृष्ट बॅटरी लाईफ असलेला Samsung Galaxy A01 स्मार्टफोन लाँच; पाहा या बजेट स्मार्टफोनची अन्य वैशिष्ट्ये

Realme C2 मध्ये Mediatek Helio G70 चिपसेट दिला जाणार आहे. ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. रियलमीने या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात 12 मेगापिक्सेलचा प्रायमरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा लेन्स देण्यात आला आहे. युजर्सना फोनमध्ये फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.

या फोनच्या बॅटरी लाईफ विषयी बोलायचे झाले तर, यात 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये युजर्स एचडी व्हिडिओ रिकॉर्डिंग करता येऊ शकणार आहे.