Realme C21Y भारतात लॉन्च; पहा किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme C21Y (Photo Credits: Realme)

चायनीज स्मार्टफोन कंपनी रिलयमी (Realme) ने आज त्यांचा नवा स्मार्टफोन सी21वाय (C21Y) भारतात लॉन्च केला. हा स्मार्टफोन यापूर्वी व्हेतनाम येथे लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोनचे कि फिचर्स (Key Features) दाखवण्यासाठी रियलमी ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक मायक्रो साईट देखील सुरु केली आहे. आज दुपारी 12.30 वाजता हा फोन लॉन्च झाला असून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही हा फोन विकत घेऊ शकता. (Realme चा स्वस्त स्मार्टफोन C11 2021 लॉन्च; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स)

रियलमी सी21वाय मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले 1600x720 पिक्सल्स रिज्योलुशन्स सह देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये इंस्ट्री लेव्हलचा Unisoc T610 SoC हा ऑक्टो-कोर प्रोसेसर देण्यात आला असून यामध्ये 4 जीबी रॅम देखील दिला आहे. ग्राफिक्ससाठी या मोबाईलमध्ये जी52 हा जीपीयू सुद्धा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला असून यात 13 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा माक्रोलेन्स कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

Realme C21Y (Photo Credits: Realme)
Realme C21Y (Photo Credits: Realme)

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली असून यासोबत वायफाय, ब्युट्युथ, व्ही5, जीपीसी, 3.5mm  जॅक आणि एक मायक्रो युएसबी पोर्ट सुद्धा दिला आहे. हा स्मार्टफोन Cross Blue आणि Cross Black या रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टफोन 3जीबी+32जीबी आणि 4जीबी+64जीबी हे दोन वेरिएंट उपलब्ध आहेत. या मोबाईल तुम्हाला 8999 रुपयांना विकत घेता येईल.