Realme चा स्वस्त स्मार्टफोन C11 2021 लॉन्च; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स
Realme C11 2021 (Photo Credits: Facebook)

चायनीज स्मार्टफोन कंपनी रियलमीने (Realme) आपल्या सी सिरीज (C Series) स्मार्टफोनमध्ये C11 2021 हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 6,990 रुपये इतकी आहे. या  स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनल स्टोरेज आणि ट्रिपल कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही 2 सीमकार्ड आणि 1 मायक्रो एचडी कार्ड वापरु शकता. हा मोबाईल कुल ब्लू आणि कुल ग्रे या शेड्स मध्ये उपलब्ध असून अॅमेझॉन (Amazon) आणि रियलमी (Realme) च्या अधिकृत वेबसाईटवरुन याची खरेदी करु शकता.

रियलमी सी11 2021 मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला असून यामध्ये 20:9 चा आस्पेट रेशो देण्यात आला आहे. स्क्रिनमध्ये दिलेल्या मीनीड्रॉपमुळे स्क्रीन टू बॉडी रेश्यो 89.5 टक्के झाला आहे. हा स्मार्टफोन जिओ मेट्रिक डिझाईनसोबत ब्लॅक कव्हरमध्ये मिळेल. (Realme चा 6000mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ग्राहकांना मिळणार शानदार ऑफर्स)

या स्मार्टफोनमध्ये 1.6GHz चा Arm Cortex-A55 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8MP चा प्रायमरी कॅमेरा दिला असून यामध्ये तुम्ही 1080P ची व्हिडिओ रेकॉर्डिंग करु शकता. यात  5000mAh ची बॅटरी रिव्हर्स चार्गिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

अलिकडेच रियलमी ने डिझो वायरलेस ब्लुट्युथ इअरफोन्स आणि डिझो गोपॉर्ड डी ट्रु वायरलेस एअरबर्ड्स लॉन्च केले आहेत. डिझो वायरलेस ब्लुट्युथ इअरफोनमध्ये 11.2mm चा बास ब्युस्टर ड्रायव्हर दिला असून यासोबत एनहास्मेंट सोल्यूशन सुद्धा दिले आहे. यामध्ये ईएनसी अल्गोरिदम असल्यामुळे कॉल दरम्यान सभोवतालचा आवाज कमी होतो, असा दावा कंपनीने केला आहे.

डिझो गोपॉर्ड डी मध्ये 10mm चा बास ब्युस्टर ड्रायव्हर दिला असून यामध्ये इंटिलिजन टच कंट्रोल आणि व्हाईस असिस्टंट सुद्धा दिला आहे. सभोवतालचा आवाज कमी करण्यासाठी नॉईज कॅन्सलेशन सपोर्ट सुद्धा आहे. यामध्ये 40mAh ची बॅटरी असून एका चार्जमध्ये तुम्ही पाच तास एअरबर्ड्स वापरु शकता.