Realme चा 6000mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ग्राहकांना मिळणार शानदार ऑफर्स
Realme Narzo Series (Photo Credits-Twitter)

रिअलमी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर रिअलमी डे सेल (Realme Day Sale) सुरु आहे. या स्मार्टफोनच्या सेलमध्ये कंपनीने त्यांचा शानदार स्मार्टफोन रिअमली नार्जो 30ए (Realme Narzo 30A) उपलब्ध आहे. यावर आकर्षक ऑफर आणि डील दिली जात आहे. प्रमुख स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास, रिअलमी नार्जो 30ए मध्ये 6000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये एचडी प्लस डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे.(Samsung घेऊन येणार भारतातील पहिला In-Display कॅमेरा फोन, पुढील महिन्यात होणार लॉन्च)

Realme Narzo 30a स्मार्टफोन 3GB रॅम+32GB स्टोरेज आणि 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या किंमती क्रमश: 8,499 रुपये, 9,999 रुपये आहे. ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनची खरेदी केल्यास mobiKwik कडून 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. त्याचसोबत फ्री चार्ज कडून 75 रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. ऐवढेच नव्हे तर नो कॉस्ट EMI वर सुद्धा हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

कंपनीने नार्जो 30ए स्मार्टफोनसाठी 6.5 इंचाचा मिनी ड्रॉप एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रेज्यॉल्यूशन 720X1600 पिक्सल आहे. याचे स्क्रिन-टू-बॉडी रेश्यो 88.7 टक्के आहे. त्याचसोबत स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट दिला आहे. हे डिवाइस अॅन्ड्रॉइड10 वर आधारित UI वर काम करणार आहे.(Amazon कडून चीनच्या 'या' 3 कंपन्यांवर बंदी, गिफ्ट कार्डचे दाखवायचे आमिष)

Realme Narzo 30a  स्मार्टफोनमध्ये उत्तम फोटोग्राफीसाठी डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये पहिला 13MP चा प्रायमरी सेंसर आणि दुसरा मोनोक्रोम लेन्स दिली आहे. तसेच सुपर नाइट मोड, क्रोम बूस्ट, पोर्टेट मोड सारखे लेटेस्ट फिचर्स दिले आहेत. या व्यतिरिक्त फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. कंपनीने यामध्ये 6000mAh ची बॅटरी दिली असून जी 18W फास्ट चार्जिंगसह रिवर्स चार्जिंग सपोर्ट करणार आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये कॅनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे फिचर्स दिले आहेत.