Amazon कडून चीनच्या 'या' 3 कंपन्यांवर बंदी, गिफ्ट कार्डचे दाखवायचे आमिष
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

ई-कॉमर्स कंपनी Amazon कडून चीनच्या 3 कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या कंपन्यांना अॅमेझॉनवर आपले प्रोडक्ट्स विक्री करता येणार नाही आहेत. अॅमेझॉनने यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे पाऊल उचलले आहे. गुआंगडोंग एससीए प्रीसिजन मॅन्युफॅक्चरिंगच्या एका विधानानुसार, Amazon ने शेनजेनची सनवॅली कंपनीच्या vava कॅमेऱ्याच्या तीन ब्रँन्डच्या सेलवर बंदी घातली आहे. त्याचसोबत RVAPower पॉवरबँख आणि Taotronics एअफोनची विक्री करण्यास सुद्धा बंदी घातली आहे.(Paytm ची 'iPhone Bonanza'ऑफर ग्राहकांना देतेय iPhone 12 जिंकण्याची संधी; इथे पहा नेमकं काय कराल?)

न्यूज एजेंसी ANI यांनी या विधानावर बातमी दिली आहे की, या कंपन्या किंवा ब्रँन्डचे ग्राहकांना गिफ्ट कार्ड पाठवत असे. त्यामुळे ग्राहकांना प्रोडक्ट्सबद्दल पॉझिटिव्ह प्रतिक्रिया लिहिता येतील.चीन मधील ई-कॉमर्स बाजारात ग्राहकांना गिफ्ट कार्ड देऊन पॉझिटिव्ह प्रतिक्रिया लिहिण्यास सांगणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र अॅमेझॉननुसार त्यांच्या या प्रतिक्रियेच्या पॉलिसीचा गैरफायदा घेतल्यासारखे आहे. मात्र या ब्रँन्डवर आता बंदी घालण्यात आली आहे.(KYC किंवा Aadhaar अपडेटच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक; Reliance Jio चा ग्राहकांना सतर्कतेचा इशारा)

अॅमेझॉन पॉझिटिव्ह रिव्हू लिहिल्यानंतर गिफ्ट कार्ड देणे किंवा मित्राकडून प्रितिक्रिया लिहिण्यासंबंधित झीरो टॉलरेंस पॉलिसीचा वापर करणे अपमानकारक आहे. जर कोणीही अशा प्रकारचे काम करत असेल तर त्यावर बंदी घातली जाते. यापूर्वी सुद्धा काही चीनी कंपन्या अॅमेझॉनच्या रडावर होत्या. अमेरिकेतील या कंपनीने TikTok ची पेरेंट कंपनी ByteDance साठी एक ऑनलाइन स्टोअरवर Mpow ला बंदी घातली आहे. ByteDance ही शाओमी आणि Patozon सोबत मिळवून चालवत होती.