Paytm ची 'iPhone Bonanza'ऑफर ग्राहकांना देतेय iPhone 12 जिंकण्याची संधी; इथे पहा नेमकं काय कराल?
Paytm (Photo Credits: IANS)

पेटीएम (Paytm) कडून सध्या ग्राहकांसाठी आयफोन बोनान्झा (iPhone Bonanza) ऑफर सुरू आहे. यामध्ये जर युजर्सनी त्यांचे इलेक्ट्रीसिटी चं बिल पेटीएम द्वारा भरलं तर त्यांना आयफोन 12 जिंकण्याची संधी मिळू शकते. ही ऑफर 8 जून पासून सुरू करण्यात आली आहे. 8 जुलै पर्यंत ही ऑफर सुरू राहणार असल्याने तुमच्याकडे अजूनही संधी आहे. दरम्यान कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार विजेत्यांना इमेल आणि फोन कॉल वरून माहिती दिली जाणार आहे. 31 जुलै पर्यंत विजेत्यांची माहिती पडताळून विजेते जाहीर केले जाणार आहेत. विजेते पेटीएम मॉल मध्ये लॉग ऑन करून वाऊचर कोड टाकून मोफत आयफोन 12 क्लेम करू शकतात.

पेटीएम कडून इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यासाठी काही दिवसांपूर्वीच 2 स्टेप इन्स्टंट पेमेंटची सोय देण्यात आली होती. या मध्ये वेळेवर रिमाईंडर्स देखील SMS द्वारा दिले जाणार आहेत. आता विजेचं बिल भरण्यासाठी युजर्सना त्यांचं राज्य निवडायचं आहे, त्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर निवडायचा आहे. नंतर बिल नंबर किंवा कस्टमर अकाऊंट नंबर टाकायचा आहे. आता तुम्ही विजेचे बील भरू शकता. पहिल्यांदा पेटीएम द्वारा विजेचं बिल भरणार्‍यांना देखील पेटीएम 50 रूपयांचा कॅशबॅक देत आहे. दरम्यान विजेत्या मिळणारा आयफोन हा 64 जीबी चा 73,900 रूपयांचा आयफोन आहे. नक्की वाचा:  Jio ची खास ऑफर; OnePlus च्या 'या' स्मार्टफोन खरेदीवर मिळतील 6000 रुपयांचे Benefits.

मागील काही महिन्यात पेटीएम कडून गॅस सिलेंडर बुकिंग वर देखील ऑफर जाहीर केली होती. नोटबंदी नंतर भारतामध्ये डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. ही सेवा देण्यासाठी आता सर्व्हिस प्रोव्हायडर देखील वाढले असल्याने आता त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे आणि अधिकाधिक ग्राहकांना स्वतःकडे खेचण्यासाठी अशा ऑफर्स दिल्या जातात.