Realme C20, Realme C21 आणि Realme C25 ची लाँच डेट आली समोर, पाहा कुठे होणार लाईव्ह इव्हेंट
Realme C20, Realme C21 and Realme C25 (Photo Credits: Flipkart)

रियलमीच्या चाहत्यांना उत्सुकता लागलेले स्मार्टफोन्स Realme C20, Realme C21 आणि Realme C25 लवकरच भारतात लाँच होणार आहे. या स्मार्टफोन्सची रिलीज डेट समोर आली असून रियलमीचे सी सीरिजचे हे स्मार्टफोन्स येत्या 8 एप्रिल लाँच होणार आहे. ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची रिलीज डेट समोर आली आहे. येत्या 8 एप्रिलला दुपारी 12.30 वाजता कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर लाँचिंगचा लाइव इव्हेंट होणार आहे. त्यानंतर हे स्मार्टफोन्स फ्लिपकार्टवर लाइव केले जातील. ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने या स्मार्टफोन्सला टीज करायला सुरुवात केली आहे.

फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार, Realme C20, Realme C21 आणि Realme C25 हे तीनही स्मार्टफोन्स ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले आहेत. त्यामुळे भारतीय बाजारात 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होतील.हेदेखील वाचा-Airtel च्या प्रीपेड युजर्संना धक्का! 100 रुपयांखालील 'हा' रिचार्ज प्लॅन बंद

यांच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, रियलमी C20 मध्ये 6.5 इंचाची HD+डिस्प्ले, मिडियाटेक हेलिओ जी35 प्रोसेसर, 2GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच यात 5000mAhची बॅटरी सुद्धा देण्यात आली आहे. यात 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme C21 मध्ये 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 3 कॅमेरे आहेत. ज्यात 13MP, 2MP आणि 2MP चा सेंसरसुद्धा आहे. यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये 6.5 इंचाची HD+ डिस्प्ले आणि मिडियाटेक हेलिओ जी35 प्रोसेसरसह येतो. त्याचबरोबर यात 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज दिली गेली आहे.

Realme C25 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाची HD+ डिस्प्ले आणि मिडियाटेक हेलिओ जी70 प्रोसेसर दिले आहे. यात 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे. यात फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.