
चायनीज स्मार्टफोन कंपनी रियलमी ने Realme 6i स्मार्टफोनचा सेल गेल्या महिन्यात आयोजित करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा स्मार्टफोनचा सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि Realme.com वर सुरु होणार आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर 1000 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक बझ कार्ड वापरुन खरेदी केल्यास 5% अनलिमिडेट कॅशबॅक मिळत आहे. तसंच अॅक्सिस बँक बझ कार्डवर 5% सूट मिळत आहे. यात नो-कॉस्ट ईएमआय आणि सँडर्ट ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
Realme 6i मध्ये 6.5 इंचाचा FHD+ ultra-smooth Corning Gorilla Glass डिस्प्ले 2400x1080 पिक्सल रेजोल्यूशन सह देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप दिला असून मेन कॅमेरा 48MP चा आहे. तर 8MP चा अल्ट्रा वाईल्ड एन्गल लेन्स देण्यात आली आहे. 2MP चा माक्रो लेन्स आणि पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.


यात Helio G90T चिपसेट प्रोसेसर असून 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,300mAh बॅटरीसह 30W फ्लॅश चार्गिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 वर आधारित Realme UI ऑपरेटिंग स्टिटमवर काम करतो.
Realme 6i मध्ये कनेक्टीव्हीटीसाठी Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, 4G LTE, Bluetooth 5.0, GPS/A-GPS, USB Type-C port आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या स्मार्टफनच्या 4GB आणि 64GB वेरिएंटची किंमत 12,999 रुपये असून 6GB आणि 64GB वेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे.