Viral Video: रिलसाठी सध्या तरुण काहीही करतांना दिसून येत आहेत. दरम्यान,  बिहारमधील अनुग्रह नारायण रोड स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीने एका प्रवाशाला चापट मारल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार रिलसाठी केल्याचे समोर आले आहे.  आरोपी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभा होता आणि समोरून गाडी जात असताना त्याने प्रवाश्याला चापट मारली. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी रितेश कुमार नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी रितेश कुमार नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. अशी रील शूट केल्याबद्दल त्याला माफी मागण्यास सांगण्यात आले होते.

येथे पाहा, प्रवाश्याला चापट मारल्याची व्हायरल व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)