Bee | Pixabay.com

Bee Attack in Rajasthan: राजस्थानमधील चित्तौडगड येथे २६ फेब्रुवारी रोजी मधमाश्यांच्या हल्ल्यात आमरी बाई या ९० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिघे गंभीर जखमी झाले होते.  वृत्तानुसार, राजस्थानच्या चित्तौडगढमध्ये मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे या भागात अशा हल्ल्यांच्या वाढत्या घटनेबद्दल  चिंता व्यक्त केली जात आहे. शेतात काम करत असतांना मधमाश्यांनी हा जीवघेणा हल्ला केला होता. अमरी बाई यांच्यासह तीन जखमींना तातडीने निंबहेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.अमरी बाई यांच्या प्रकृतीची तीव्रता लक्षात घेऊन तिला चित्तौडगड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे 27  फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.

स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली या घटनेने नागरिक चिंतीत आहेत. कारण यापूर्वीही या भागात मधमाश्यांचे हल्ले झाले आहेत, परंतु यापूर्वी जीवितहानी झाली नव्हती.