ऑनलाईन खरेदीमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी RBI चे Mobile Wallets साठी नवीन नियम लागू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्वीटर)

गेल्या काही दिवसांपासून Paytym,PhonePe या सारख्या मोबाईल ई-सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणुक होत आहे. त्यासाठी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने(RBI) नवीन नियम लागू केले आहे. या नियमामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे.

तसेच मोबाईल वॉलेट युजर्ससाठी क्रेडिट आणि डेबिट कार्डसारखी सुरक्षितेचे नियम लागू केले जाणार आहेत. तर पाहूयात कोणते आरबीआयने मोबाईल वॉलेटसाठी नवीन नियम लागू केले आहेत.

1. मोबाईल वॉलेटच्या सर्व कंपन्यांना ट्रांजेक्शन अलर्ट मेसेज सोबत एक कॉन्टॅक नंबर उपलब्ध करुन देणार असल्याचे आरबीआयने सांगितले आहे. त्यानुसार युजर्स त्यांची झालेली फसवणुक येथे नोंदवू शकणार आहेत.

2. Paytym, PhonePe, Amazon Pay सारख्या अन्य कंपन्यांनी युजर्सने दिलेली माहिती खरी असल्याचे तपासणे. तसेच प्रत्येक ट्रान्सजेक्शनचे एक मेसेज किंवा ईमेल युजर्सला प्राप्त होणार आहे.

3. सर्व मोबाईल वॉलेट कंपन्यानी 24/7 कार्यरत असणारी कस्टमर केअर हेल्पलाईन सुरु ठेवण्यात यावी असे सांगितले आहे.त्यामुळे फसवणुक झालेला युजर्स येथे त्याची नोंद करु शकतो.

4. फसवणुक झालेल्या युजर्सने जर तीन दिवसाच्या आतमध्ये त्याच्या फसवणुकीची माहिती दिल्यास त्याला वस्तूचे संपूर्ण पैसे परत मिळणार आहेत.

5.तसेच फसवणुक झालेली तक्राराची नोंद मोबाईल वॉलेट कंपन्यांनी केली नाही तर त्या कंपनीलाच युजर्सला पैसे द्यावे लागणार आहेत.

6. युजर्सने फसवणुक झाल्यानंतर 7 दिवसांनी याबाबत तक्रार केल्यास त्याला आरबीआयने लागू केलेल्या मोबाईल वॉलेटच्या कंपन्यांच्या पॉलिसीनुसार पैसे परत मिळणार आहेत.

7. फसवणुक झालेली तक्रार 90 दिवसांत सोडवली नाही तर कंपनीला युजर्सला वस्तूचे पूर्ण पैसे परत द्यावे लागणार आहेत.

8. ज्या युजर्सनी KYC वेरिफिकेशन केले नसेल तर त्यांचे फेब्रुवारी महिन्यानंतर मोबाईल वॉलेट बंद होणार आहे.