TV | Representational Image (Photo Credits: Pixabay)

डिजिटल टेलिव्हिजन रिसीव्हर्स (Television Receivers) , यूएसबी टाइप-सी चार्जर (USB Type-C charger) आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टम (Video Surveillance Systems- VSS) यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने नवी गुणवत्ता मानके आणली आहेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रथम भारतीय मानक IS 18112:2022 हे बिल्ट-इन सॅटेलाइट ट्यूनर्ससह डिजिटल टेलिव्हिजन रिसीव्हर्ससाठी स्पेसिफिकेशन असणार आहे. सरकारने जारी केलेल्या नव्या भारतीय मानकांनुसार उत्पादीत केले जाणारे टीव्ही, इमारतीच्या छतावर अथवा बाजूच्या भिंतींवर योग्य ठिकाणी बसवल्या जातील. ज्या LNB सोबत डिश अँटेना जोडून फ्री-टू-एअर टीव्ही आणि रेडिओ चॅनेलचा रिसेप्शन अधिक सक्षम करतील. ज्यायोगे ग्राहकांना सुरक्षीत आणि अधिक चांगल्या दर्जाची सेवा मिळू शकेल.

नव्या मानकांचे पालन केल्यामुळे माहिती, ज्ञान आणि मनोरंजन नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी याशिवाय सरकारी उपक्रम, योजना, दूरदर्शनची शैक्षणिक सामग्री आणि भारतीय संस्कृती कार्यक्रमांचे भांडार याविषयीचे ज्ञान प्रसारित करणे आणि देशातील मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचणे आणि त्याचा लाभ घेणे सुलभ होईल, असेही सरकारने म्हटले आहे.

आजघडीला देशामध्ये ग्राहकांना टीव्हीवरील कार्यक्रम पाहायचे असतील तर त्यासाठी त्यांना विविध सशुल्क आणि विनामूल्य चॅनेल पाहण्यासाठी सेट-टॉप बॉक्स खरेदी करणे आवश्यक आहे. दूरदर्शनद्वारे प्रसारित केलेल्या फ्री टू एअर चॅनेलच्या (एनक्रिप्टेड नसलेल्या) रिसेप्शनसाठी देखील दर्शकाने सेट टॉप बॉक्स वापरणे आवश्यक आहे. परंतू, आता दूरदर्शन अॅनालॉग ट्रान्समिशन बंद करण्याच्या विचारात आहे. दरम्यान, दूरदर्शनद्वारे डिजिटल सॅटेलाइट ट्रान्समिशनचा वापर करून फ्री-टू-एअर चॅनेलचे प्रसारण सुरू राहील.