पबजी (PUBG) गेमची क्रेझ केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. जगभरात या गेमचे लाखो-करोडो चाहते आहेत. पबजी गेमची ही क्रेझ लक्षात घेत पबजीने काही इंटरेस्टिंग बदलांसह एक नवा अपडेट जारी केला आहे. मात्र हे नवे अपडेट फक्त कन्सोल व्हर्जन (Console Version) साठी लॉन्च करण्यात आले आहे. पबजीने ऑनलाईन गेमिंग क्षेत्रात चांगलेच बस्तान बसवले असून यात वेळोवेळी नवनवे अपडेट्स आणले जातात. त्यामुळे गेम खेळणाऱ्यांची रुची अधिकच वाढते. (अहमदनगर: विवाहित तरुणाने PUBG मुळे स्वत:वर झाडल्या गोळ्या? जिल्ह्यात आत्महत्येच्या प्रकारामुळे खळबळ)
पबजीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलेल्या माहितीनुसार, हे नवे अपडेट पीसी व्हर्जनसाठी पूर्वीच लॉन्च करण्यात आले होते. मात्र आता हे अपडेट कन्सोल व्हर्जनसाठी देखील उपलब्ध आहेत. यात नवी गाडी BRDM-2, नवा पिस्टल Deagle आणि विस्फोटक गॅसच्या डब्यासह अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
पबजी ट्विट:
The Deagle, BRDM-2, Ledge Grab and more are available on Console PTS Server TODAY! Drop in now to test the new features.
Read More: https://t.co/kvZHESmI7c pic.twitter.com/RkhfOWSM18
— PUBG (@PUBG) July 24, 2019
याशिवाय खेळाचा अनुभव अधिकच चांगला करुन गेमर्सला नवी अनुभूती देण्याचा आणि बग फिक्स (Bug Fix) करण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे. 30 मिनिटांसाठी येणारा जॉम्बी मोड गेमर्सला तीन दिवस आणि दोन रात्रींचा खेळण्याचा अनुभव देतो. ज्यात पबजी खेळणाऱ्यांना विविध प्रकारच्या जॉम्बीचा सामना करावा लागतो. (PUBG च्या नादात चार लहानग्यांनी घरातील 1 लाख रुपये चोरून केलं पलायन, पोलिसांनी पकडल्यावर सांगितलं भलतंच कारण)
गेल्या महिन्यापर्यंत भारतासह जगातील 40 कोटींहून अधिक लोकांनी पबजी गेम डाऊनलोड केला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या बाहेर पबजी मोबाईलचे 5 कोटींहून अधिक युजर्स आहेत. हा गेम सर्वप्रथम चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता.