अहमदनगर: विवाहित तरुणाने PUBG मुळे स्वत:वर झाडल्या गोळ्या? जिल्ह्यात आत्महत्येच्या प्रकारामुळे खळबळ
Pubg Addiction | (Photo credit: archived, edited, symbolic images)

अहमदनगर (Ahamadnagar) येथील एका विवाहित तरुणाने स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या घटेनेचे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

राहुल पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. श्रीरामपूर येथे राहत असलेल्या राहुल याने आज सकाळी अचानक स्वत:वर गोळ्या झाडल्या. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अकस्मात मृत्यूची नोंद सध्या करण्यात आली आहे.(पबजी गेम खेळताना अडविले, बायकोची नवऱ्याकडे घटस्फोटाची मागणी)

काही दिवसांपासून राहुल याला पबजी गेम खेळण्याचे खुप वेड लागले होते असे नातेवाईक आणि मित्रांनी स्पष्ट केले. परंतु नक्की पबजीमुळे आत्महत्या केली आहे का याबद्दल अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.