
Poco X5 5G: Poco चा नवीन फोन Poco X5 5G भारतात 14 मार्चला लॉन्च होणार आहे. मात्र, त्याआधी फोनचे सर्व फीचर्स लीक झाले आहेत. Poco X5 5G ची विक्री देखील Flipkart वरून 14 मार्चपासून सुरू होईल. Poco X5 5G बद्दल कंपनीने पुष्टी केली आहे की, हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर मध्ये सादर केला जाईल. Poco X5 5G चा लॉन्चिंग इव्हेंट Poco च्या YouTube चॅनलवर प्रसारित केला जाईल.
Poco X5 5G चे काही फीचर्स आणि किंमत लॉन्च होण्यापूर्वी लीक झाली आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Poco X5 Pro ला 3.5mm हेडफोन जॅक मिळेल. याशिवाय फोनमध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. Poco X5 5G च्या डिस्प्लेसह फुल एचडी + रिझोल्यूशन उपलब्ध असेल. Poco X5 5G ला स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. (PC - Kotak Bank Server Down: कोटक बँकेच्या सर्व्हरमध्ये बिघाड, ग्राहक Gpay, Phone Pay, UPI सह Paytm चा वापर करण्यास असमर्थ)
याशिवाय, Poco X5 5G मध्ये तीन रियर कॅमेरे उपलब्ध असतील, ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 64 मेगापिक्सेल असेल. फोनमध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स असेल आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो असेल. समोर 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
All eyes are on the All Star. 👀
Latest in line, the POCO X5 5G is all set to launch on 14th March at 12PM on @flipkart.
Save this link now 👉🏿 https://t.co/uMfXEeRzFu#The5GAllStar pic.twitter.com/0208FTsVO9
— POCO India (@IndiaPOCO) March 9, 2023
Poco X5 5G मध्ये 5000mAh बॅटरी मिळू शकते. ज्यासह 33W फास्ट चार्जिंग देखील उपलब्ध असेल. Android 12 आधारित MIUI 13 फोनसोबत उपलब्ध असेल. Poco X5 5G ची किंमत जवळपास 20,000 रुपये असेल, असे बोलले जात आहे. पोकोच्या या फोनमध्ये 5G चे 7 बँड उपलब्ध असतील.