डिजिटल पेमेंट रेग्युलेटर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी UPI पेमेंट्स संदर्भात नव्या मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार जर थर्ड पार्टी पेमेंट अॅप UPI फ्रेमवर्कच्या एकूण ट्राजेक्शनच्या 30 टक्के अधिक वॉल्यूममध्ये ट्राजेक्शन करु शकणार नाही आहे. ही लिमिट 1 जानेवारी 2021 पासून लागू होणार आहे. मात्र एनपीएसआय च्या नव्या नियमानुसार थर्ड पार्टी पेमेंट्स अॅप नाखुश झाले आहेत. तर डिजिटल पेमेंट अॅप PhonePe ने ट्राजेक्शन संबंधित मोठे विधान केले आहे.(ATM PIN: बँकेत न जाता एटीएम कार्डचा पिन रिसेट कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)
फोनपे चे असे म्हणणे आहे की, त्यांच्या युजर्ससाठी ट्राजेक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आहे. म्हणजेच फोन पे युजर्सला कोणत्याही त्रासाशिवाय ट्राजेक्शन करु शकणार आहेत. त्याचे ट्राजेक्शन Fail सुद्धा होणार नाही आहे. कंपनीचे सीईओ आणि फाउंडर समीर निगम यांनी असे म्हटले की. आम्ही NCPI च्या परिपत्राची पूर्णपणे समीक्षा केली आहे. त्यानंतरच आपल्या युजर्ससह व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की, फोन पे वर कोणतेही युपीआय ट्राजेक्शन मध्ये समस्या येणार नाही आहे. एनपीसीआयच्या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की, 30 टक्के मार्केट शेअर कॅम्प सध्याच्या TPAPs सारखे PhonePe वर जानेवारी 2023 पर्यंत लागू नसणार आहे.(WhatsApp Pay म्हणजे काय? या नव्या फिचरचा वापर करुन पैशांची देवाण-घेवाण कशी कराल? जाणून घ्या)
तर एनपीसीआयच्या नव्या मार्गदर्शक नियमांचे पालन WhatsApp Pay सारख्या नव्या कंपन्यांना जानेवारी 2021 पासून करावे लागणार आहे. परंतु 1 जानेवारी पासून लागू होणाऱ्या या नव्या गाइडलाइन्सनचा परिणाम PhonePe व्यतिरिक्त Google Pay, Paytm आणि Mobilwik सह WhatsApp Pay वर सुद्धा पहायला मिळणार आहे.