फोनमधील 'या' 5 सेटिंग्स लगेच करा अपडेट, हॅकिंग आणि फसवणूकीला बळी पडण्यापासून होईल बचाव
Representational Image (Photo Credit: PTI)

जर तुम्ही बहुतांश वेळ स्मार्टफोनवर घालवत असाल तर तुमच्या फोनमधील सेटिंग्स मध्ये काही बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सध्याच्या दिवसात स्मार्टफोनवर आपण पाहतो की सगळेच जण व्यस्त असातात. पण आपल्या फोनची सुरक्षितता कशी ठेवावी अशी माहिती काही कमी लोकांनाच माहिती असते. तर फोनमधील सेटिंग्स मध्ये काही बदल केल्यास हॅकिंग आणि ऑनलाईन फसवणूकीपासून बचाव होऊ शकतो. या व्यतिरिक्त फोनच्या सेटिंग्सच्या माध्यमातून डेटा सुद्धा सुरक्षित करता येऊ शकतो. तर जाणून घ्या स्मार्टफोन मधील अशा कोणत्या सेटिंग्स आहेत ज्या आपल्यासाठी जरुरी आहेत.

युजरला आपल्या प्रायव्हसीसाठी फोनचे लोकेशन टर्न ऑफ करावे. ज्यामुळे तुमचे लोकेशन ट्रॅक करता येणार नाही. जर तुम्ही iPhone युजर असल्यास फोनच्या सेटिंग्समध्ये प्रायव्हसी सेक्शनमध्ये जाऊन लोकेशन परमिशन ऑफ करावे. तर अॅन्ड्रॉइड युजर्सने लोकेशन ऑफ करण्यासाठी सेटिंग्समध्ये जावे. लोकेशन हिस्ट्रीसह अॅप एक्सेस परमिशन सुद्धा हटावावे.(WhatsApp ला मोठा झटका, 28 टक्के युजर्स बंद करणार ॲपचा वापर)

फोनमधील काही सर्व अॅप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सारखे Facebook आणि Twitter वर लॉगिन करण्याची परवानगी देतो. मात्र असे करणे धोकादायक ठरु शकते. खरंतर असे काही अॅप तुमची खासगी माहिती फेसबुक आणि ट्विटरवरुन चोरी करतात. यासाठी युजर्सने असे करण्यापासून बचाव करावा. त्यामुळे जर एखादा अॅप किंवा वेबसाइट या पद्धतीची सुविधा देत असल्यास त्याचा वापर करण्यापासून दूर रहा. सर्च प्लॅटफॉर्मवर फेसबुक आणि ट्विटरवरुन माहिती मिळवण्यासाठी परवानगी मागितली जाते. अशावेळी तुमची पर्सनल माहिती चोरी केली जाऊ शकते. काही गेमिंग अॅप खेळण्यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती मागतात. त्यापासून सुद्धा बचाव करा.

तसेच लॉक स्क्रिन वरील नोटिफिकेशनसह काही गोष्टी पाहू शकतो. परंतु नोटिफिकेशनच्या आधारावर येणारे सेंसेटिव्ह कंन्टेंट दुसरा सुद्धा पाहू शकतो. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही नोटिफिकेशनवर कंन्टेंट लपवू शकता. असे केल्यास फोनच्या सेटिंग्स ऑप्शनमध्ये जावे. जेथे नोटिफिकेशनवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर फोनची स्क्रिनच्या वरती बाजूला असलेल्या कॉग आयकॉनवर क्लिक करावे. असे केल्यास लॉक स्क्रिन वर टॅप करावे लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही सेंसिटिव्ह नोटिफिकेशन लपवू शकता.

गुगल आपल्या सर्व गतविधी ट्रॅक करतात. जर एखाद्याकडून तुमची प्रायव्हसी चोरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर व्यक्तिगत जाहिरातीपासून बाहेर पडू शकतात. असे करण्यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्समध्ये जावे लागणार आहे. यानंतर गुगल अॅडमध्ये  Enable Opt out of Ads Personalization वर क्लिक करावे लागणार आहे.(Facebook युजर्स सावध व्हा, 61 लाख भारतीयांचा डेटा लीक झाल्याने बचाव करण्यासाठी 'या' मार्गाचा वापर करा)

त्याचसोबत इस्टंट ऑटो लॉक ऑप्शन फोनच्या सिक्युरिटीसाठी अधिक महत्वाचे आहे. जर तुम्ही फोन लॉक करण्यास विसरुन गेल्यास हे फिचर एखाद्याच्या फोनचे एक्सेस करण्यापासून रोखते. यासाठी युजर्सला फोनच्या सेटिंग्स ऑप्शनमध्ये क्लिक करावे लागणार असून तेथून ऑटो लॉत इनेबल करता येणार आहे.