बॅंक खात्यात पैसे जमा करण्यासाठी बहुतांश लोक बचत खात्यात टाकण्याचा विचार करतात. तसेच बचत खात्यात (Saving Account) जमा झालेल्या रक्केमवर बँकेकडून व्याज ही दिले जाते. मात्र गेल्या काही महिन्यामध्ये विविध बँकांकडून बचत खात्यावर देण्यात येणाऱ्या व्याजदरात कपात केली आहे. नुकत्याच देशातील सर्व मोठी एसबीआय (SBI) बँकेने खात्यात जमा झालेल्या रक्कमेवर कात्री लावली आहे. ज्या लोकांनी बचत खाते पेटीएमसोबत लिंक केले आहे त्यांना आता मोठा झटका देण्यात आला आहे.
खरंतर पेटीएमसोबत संलग्न असलेल्या बँक मधील बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर अर्धा टक्के कपात करुन 3.5 टक्के केली आहे. पेटीएमने बँकेकडून जाहीर केलेल्या विधानात असे म्हटले आहे की, 1 नोव्हेंबर पासून हा नियम लागू होणार आहे. त्याचसोबत पेटीएमसोबत लिंक केलेल्या बँकांनी त्यांच्या ग्राहकांना एफडी बाबत विचार करावा असे ही सांगितले आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रक्कमेवर पीबीएच्या भागीदार बँकेच्या माध्यमातून 7.5 टक्के व्याज मिळणार आहे. बँकेचे एमडी सतीश कुमार गुप्ता यांनी असे म्हटले आहे की, आरबीआयने नुकत्याच रेपो रेट मध्ये चतृर्थांश टक्के कपात करुन 5.15 टक्के केला आहे. गेल्या 12 महिन्यात केंद्रीय बँकेच्या रेपो दरात 1.35 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.(ऑलनाईन पद्धतीने व्यवहार अयशस्वी झाल्यास रिफंड मिळेपर्यंत ग्राहकाला दररोज मिळणार 100 रुपये; RBI कडून निर्देशन)
त्याचसोबत ग्राहकाने जर एफडी खाते सुरु केल्यास त्यावर 7.5 टक्के व्याज देण्यात येणार आहे. त्यामुळे एफडीवर देण्यात येणारी व्याजाची रक्कम ग्राहक कधीही काढू शकणार आहे. तर एसबीआयने बचत खात्यात 1 लाख रुपये असल्यास त्यावर 3.25 टक्क्यांप्रमाणे व्याज देणार आहे. आतापर्यंत या रक्कमेवर 3.50 टक्क्यांप्रमाणे ग्राहकांना व्याज देण्यात येत होते. म्हणजेच बँकेच्या ग्राहकांना आता 0.25 टक्के कमी व्याज मिळणार आहे.