Paytm युजर्स सावधान! स्मार्टफोनमध्ये 'हे' अ‍ॅप असल्यास बँक खात्यामधून चोरी होतील पैसे
Paytm Payment Bank (Photo Credit: Paytm Payment Bank/Official Site)

स्मार्टफोन युजर्ससाठी पेटीएमने एक महत्वाची सुचना दिली आहे. कारण पेटीएम (Paytm) अ‍ॅपच्या माध्यमतून जर तुम्ही KYC करत असल्यास सावधानता बाळगण्याचे आवाहन देण्यात आले आहे. याबाबत कंपनीकडून एक नोटीस काढण्यात आली असून युजर्सला केवायसीसाठी अॅनीडेस्क किंवा क्विकसपोर्ट यासारखे अ‍ॅप डाऊनलोड करु नये असे सांगण्यात आले आहे. तसेच अशा पद्धतीचे अ‍ॅप डाऊनलोड केल्यास तुमच्या बँक खात्यामधून पैसे चोरी होण्याची शक्यता असल्याचे पूर्वसुचना युजर्सला कंपनीकडून देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच रिमोट अ‍ॅपसारखे अॅनीडेस्क आणि टीमव्युअरच्या माध्यमातून युजर्सला गंडा घालतल्याचे प्रकार समोर आले आहेत. या वर्षाच्या सुरुवातील आरबीआयने याबबत सुद्धा सुचना देत नागरिकांना स्मार्टफोनमध्ये डिजिटल पेमेंट संदर्भातील अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी काळजी घेण्यास सांगितली होती. काही रिमोट अ‍ॅप युजर्सची माहिती लीक करतात. या प्रकारला आयटी सेक्टरमध्ये स्क्रीन शेअरिंग असे सोप्या भाषेत म्हटले जाते.

गंडा घालणारे लोक ग्राहकांना फोन करत आम्ही बँकेचे अधिकारी बोलत असल्याचे सांगतात. त्यावेळी बँकेसंबदर्भात काही अडथळे येत आहेत का याबद्दल या खोट्या लोकांकडून विचारले जाते. तसेच काही अडथळा असल्यास ग्राहकाला नेट बँकिंगचा ऑप्शन दिला जातो. हा ऑप्शन ग्राहकाला पटल्यास त्याला एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितला जातो. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर विचारला जाणारा 9 अंकी कोड तेथे पोस्ट करताच गंडा घालणारे लोक तुमच्या स्मार्टफोनचा सगळा डेटा अॅक्सिस करु शकतात.(Porn Video ऑनलाईन पाहता? सावधान! ब्लॅकमेल करण्यासाठी केलं जातंय व्हिडिओ रेकॉर्डिंग)

अशा प्रकारच्या माध्यमातून जेव्हापण तुम्ही मोबाईल बँकिंग, पेटीएम आणि UPI च्या माध्यमातून पैश्यांचे व्यवहार करतात त्यावेळी तुमच्या खात्यामधील अधिकतर रक्कम चोरी केली जाते. त्यामुळे पेटीएम युजर्सने अ‍ॅप संदर्भात केवायसी करताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचे नियम वाचूनच ते डाऊनलोड करावे असे आवाहन वेळोवेळी युजर्सला केले जाते.