Paytm Navratri Gold offer: LPG Booking वर दररोज मिळवा 10001 रुपयांचे सोने; जाणून घ्या कसे कराल बुकिंग
Paytm (Photo Credits: IANS)

एलपीजी गॅस  सिलिंडर बुकिंगवर (LPG Booking) पेटीएमने (Paytm) ग्राहकांसाठी बंपर ऑफर सुरु केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने ऐन सणासुदीच्या काळात ही ऑफर ग्राहकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. नवरात्रोत्सव काळात ही ऑफर सादर करण्यात आली आहे. ही ऑफर एलपीजीच्या तीन कंपन्यांवर उपलब्ध आहे- Indane, HP Gas आणि Bharat Gas. (Paytm ची खास ऑफर; IPL सामन्यांदरम्यान रिचार्ज केल्यास मिळेल 100% पर्यंत कॅशबॅक)

पेटीएम गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर दररोज 10,001 रुपयांचे पेटीएम डिजिटल गोल्ड जिंकण्याची संधी देत ​​आहे. नवरात्र काळात गॅस बुकिंग केलेल्या ग्राहकांपैकी 5 भाग्यवान ग्राहकांना कॅश प्राईजद्वारे रिव्हाड्स मिळतील.

7 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या ऑफरचा लाभ युजर्स 16 ऑक्टोबर पर्यंत घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत एलपीजी गॅस बुकिंगवर सर्व युजर्संना 1000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक पॉईंट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर टॉप ब्रँडचे इतर डिल्स आणि रिव्हार्ड व्हाऊचर्स जिंकण्याची संधी या ऑफरमध्ये मिळणार आहे.

पैटीएम मधून गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स:

# पेटीएम अॅपमध्ये Recharge & Bill Payment मधील Gas Cylinder च्या आयकॉनवर क्लिक करा.

# गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी गॅस पुरवठादाराचे नाव सिलेक्ट करा.

# त्यानंतर एलपीजी कन्जुमर नंबर आणि एजन्सीचे नाव सिलेक्ट करा.

# मग गॅस बुकिंगचे पेमेंट पेटीएमद्वारे ऑनलाईन करा.

# नवरात्र काळात गॅस बुकिंग करणाऱ्या 5 भाग्यवान विजेत्यांना दररोज 10001 रुपयांचे पेटीएम गोल्ड मिळेल.

दरम्यान, 6 ऑक्टोबर रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ करण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळात ही वाढ केल्याने याचा फटका नक्कीच सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यात पैटीएमने ही ऑफर सुरु करुन सर्व युजर्संना दिलासा दिला आहे.