Paytm (Photo Credits: ANI)

आयपीएल सीजन (IPL Season) मध्ये पेटीएम (Paytm) ने मोबाईल रिचार्जवर (Mobile Recharge) ग्राहकांसाठी आकर्षक कॅशबॅक ऑफर्स (Cashback Offers) सादर केल्या आहेत. दररोज पहिल्या 1000 ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. ही ऑफर 10 रुपये आणि त्यापेक्षा अधिक किंमतीच्या रिचार्ज प्लॅनवर उपलब्ध आहे. जिओ (Jio), व्हीआय (Vi), एअरटेल (Airtel), बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएल (MTNL) च्या रिचार्जवर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

जिओच्या 11, 21 आणि 51 रुपयांच्या डेटा प्लॅन इतका कॅशबॅक नवी ग्राहकांना मिळेल. त्याचबरोबर वोडाफोन आयडीच्या 16 आणि 48 रुपयांच्या प्लॅनवर तसंच एअरटेलच्या 48 रुपयांच्या प्लॅनवर नवीन ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. आयपीएल सामन्यांदरम्यान दररोज संध्याकाळी 7.30 ते  रात्री 11 वाजेपर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल. तसंच त्या युजर्संना कॅशबॅक पॉईंट्स देखील मिळतील. ज्याचा वापर करुन पेटीएमवरील वेगवेगळ्या डिल्सचा ते लाभ घेऊ शकतील.

युजर्सच्या सोयीसाठी पेटीएमने 3-click instant recharges हे नवे फिचर लॉन्च केले असून ते अगदी युजर फ्रेंडली आहेत. विशेष म्हणजे पेटीएम पेमेंट मोड निवडण्याची सोय ग्राहकांना देत आहे. पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग किंवा पेटीएम पोस्टपेड याद्वारे तुम्ही रिजार्ज किंवा पेमेंट करु शकता. त्याचबरोबर प्लॅनची व्हॅलिडीटी संपण्याच्या मुदतीची पेटीएम युजर्संना आठवण करुन देतं. (आता FASTag च्या माध्यामातून मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm सुरु करणार नवी सेवा)

"मोबाईल रिचार्ज पेटीएमवरील सर्वात लोकप्रिय सेवांपैकी एक आहे. या आगामी क्रिकेट हंगामात आम्ही आमच्या वापरकर्त्यांना एक विशेष मेजवानी देऊ इच्छितो आणि 100 टक्के कॅशबॅकच्या विशेष ऑफरसोबत गेम साजरा करू इच्छितो," असे पेटीएमच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

वीज बिल, मोबाईल, ब्रॉडबँड आणि डीटीएच रिचार्ज, भाडे पेमेंट, म्युच्युअल फंड, स्टॉक, डिजिटल गोल्ड, विमा प्रीमियम भरणे ते अगदी ट्रेन/हवाई तिकीट, क्रेडिट कार्डची बिले युजर्स पेटीएमद्वारे भरु शकतात. त्यामुळे दैनंदिन गरजा अगदी घरबसल्या पूर्ण करता येतात.