पाकिस्तानी हॅकर्स कडून भारतातील वीज कंपन्यांसह सरकारचा कारभार निशाण्यावर- Reports
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

दिवसागणिक सायबर हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आगे. यामागे काही चीनी हॅकर्सचा हात असल्याचे बऱ्याच वेळा बोलून दाखवले जाते. अशातच आता पाकिस्तान हॅकर्सचे नाव सुद्धा यामध्ये असल्याचे एका रिपोर्ट्समधून समोर आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एका नव्या व्हायरसच्या मदतीने पाकिस्तानात असलेल्या सायबर हल्लेखोरांनी भारतातील वीज कंपन्यांसह कमीत कमी एका शासकीय संघटनेला आपला निशाणा बनवले आहे. सायबर हल्लेखोरांनी नव्या प्रकारचे रिमोट एक्सेस ट्रोजन इंस्टॉल केले होते. यामुळे एखाद्याच्या कंप्युटरवर पाळत ठेवली जाते. ऐवढेच नव्हे तर अटॅकर्सकडून भारतात हल्ला झालेल्या डोमेन URL चा सुद्धा वापर केला गेला.

या सायबर हल्ल्याला सर्वात प्रथम Lumen Technologies च्या ब्लॅक लोटसच्या सिक्युरिटी टीमने रिपोर्ट केले होते. यामध्ये असे सांगण्यात आले की, हॅकर्स ग्रुप्सला जो IP अॅड्रेस दिला गेला आहे तो पाकिस्तानातील मोबाइल डेटा ऑपरेटर CMPak Limited चा आहे. याला पाकिस्तान मधील Zong 4G नावाने सुद्धा ओळखले जाते. हा मोबाइल ऑपरेटर चाइना मोबाइल कम्युनिकेशन्स कॉर्पोरेशनचा सुद्धा हिस्सा आहे.(नव्या IT नियमांबद्दल केंद्र सरकार सोबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर Twitter कडून Transparency Report जाहीर)

India Today TV सोबत बातचीत करताना ब्लॅक लोटस लॅब्सचे प्रमुख Michel Benjamin यांनी असे म्हटले की, काही इंडिकेटर्स उपलब्ध आहेत. जे सांगतात की, हल्लेखोर पाकिस्तानात आहेत. हे सर्वजण भारताला टार्गेट करत आहेत.त्यांच्याकडून वीज कंपन्यांसह सरकारच्या काही कारभारावर नजर ठेवून होते.

पाकिस्तानातील हॅकर्सच्या नेटवर्कने अफगाणिस्तान मधील सुद्धा इंफ्रास्ट्रक्चरला टार्गेट केले होते. हे सुद्धा भारतात करण्यात आलेल्या सायबर हल्ल्याप्रमाणे होते. दरम्यान, भारतापेक्षा कमी प्रमाणात त्यांना अफगाणिस्तानवर सायबर हल्ला करण्यात आला होता. यासाठी हॅकर्स नव्या व्हायरसचा वापर करतात ज्याबद्दल सहजा नागरिकांना माहिती नसते. या व्यतिरिक्त ते सिक्युरिटी कम्युनिटी मधील ओळखीच्या व्हायरसचा सुद्धा वापर करत आहेत.

नुकत्याच चीनी सायबर हल्ल्याला गेल्या वर्षात मुंबई मध्ये झालेल्या वीज खंडितप्रकरणी जोडले गेले होते. वीज खंडीत झाल्याने महत्वाचे कामकाज आणि ट्रेन सुद्धा बंद पडल्या होत्या. International Institute For Strategic Studies (IISS) च्या एका रिपोर्टनुसार भारताने सायबर सिक्युरिटी अधिक मजबूत बनवण्यासाठी खुप काम केले आहे.