नव्या IT नियमांबद्दल केंद्र सरकार सोबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर Twitter कडून Transparency Report जाहीर
Twitter | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नव्या आयटी नियमानुसार ट्विटर आणि सोशल मीडिया दरम्यान सातत्याने वाद होत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता कंपनीने आपला ट्रांन्सपॅरेंसी रिपोर्ट (Transparency Report) जाहीर केला आहे. ट्विटरकडून हा रिपोर्ट नवे आयटी नियम जाहीर केल्याच्या एका महिन्यानंतर जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये महिन्याभरातील किती युजर्सच्या तक्रारींचे निवारण केले असे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत त्यांच्या विरोधात कारवाई सुद्धा केली असून त्याची लिंक किंवा युआरएल सुद्धा दिली आहे.

ट्विटरने आपल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले की, आम्ही हा रिपोर्ट मासिक आधारावर प्रकाशित करणार आहोत. तसेच आम्ही सरकारद्वारे प्राप्त झालेल्या प्रतिक्रियेच्या आधारावर अधिक क्लिअर डेटा देण्यासाठी परवानगी देणाऱ्या आंतरिक परिवर्तनानुसार वेळोवेळी बदल करण्यास प्रतिबद्ध आहे.(Twitter कडून 8 आठवड्यात नियुक्त केला जाणार तक्रार निवारण अधिकारी, हायकोर्टाला कंपनीने दिले स्पष्टीकरण)

यंदाच्या वर्षी 26 मे ते 25 जून दरम्यानच्या डेटाला एकत्रित करणाऱ्या ट्रान्सपॅरेंसी रिपोर्टमध्ये छळ, मानहानी, दहशतवाद आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे. रिपोट्समध्ये असे ही सांगण्यात आले आहे की, एकूण 37 तक्रारी दाखल करण्यात आल्या. यामधील 20 मानहानी वरील होत्या. कंपनीने पुढे असे म्हटले की. त्यांनी या तक्रारीसंबंधित 132 ट्विट्सच्या विरोधात कारवाई केली असून 22 हजारांहून अदिक ट्विट्स फ्लॅग केले आहेत.

कंपनीने असे म्हटले आहे की, नग्नता आणि लहान मुलांचे शोषण करणाऱ्या गोष्टींना प्रोत्साहन देणारे 18 हजारांहून अधिक ट्विट्सवर सुद्धा कारवाई केली आहे. त्याचसोबत दहशतवादाला बढावा देणारे 4 हजारांहून अधिक ट्विट्स फ्लॅग केले आहेत. पुढे असे म्हटले की, याच्या इंटरनल टूल्स आणि अन्य इनिथिएटिव्सने या तक्रारींना मॉनिटर करण्यासह कारवाई करण्यास मदत केली. त्याचसोबत एक इन्फॉर्मल रिपोर्ट सुद्धा तयार केला आहे.