चीनी कंपनी ओप्पोचा नवीन स्मार्टफोन ओप्पो रेनो 5 प्रो 5 जी (Oppo Reno 5 Pro 5G) उद्या (18 जानेवारी) भारतात लॉन्च होणार आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचे मायक्रो पेज लाईव्ह करण्यात आले आहे. यानुसार, उद्या दुपारी 12.30 वाजता ओप्पो रेनो प्रो 5 जी स्मार्टफोनचे लॉन्चिंग होणार आहे. ओप्पो रेनो 5 सीरीजमध्ये ओप्पो रेनो 5 5जी (Oppo Reno 5 5G), ओप्पो रेनो 5 प्रो 5जी (Oppo Reno 5 Pro 5G) आणि ओप्पो रेनो 5 प्रो प्लस 5जी (Oppo Reno 5 Pro+ 5G) लॉन्च होण्याची शक्यता आहे. हे सर्व स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च झाले आहेत. हे स्मार्टफोन भारतात लॉन्च झाल्यानंतर मोठी पसंती मिळवणार, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ओप्पो रेनो 5 जी प्रो 5जी दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 38 हजार 200 असण्याची शक्यता आहे. तर, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 42 हजार 700 असू शकते. हे देखील वाचा- Hike Messenger App Shuts Down! हाइक स्टिकर चॅट ॲप बंद झाल्यानंर युजर्स झाले इमोशनल, पहा व्हायरल ट्विट्स आणि मिम्स
ओप्पो ट्वीट-
Tune in to watch the Infinite Possibilities of Videography at the launch of #OPPOReno5Pro 5G with AI Highlight Video.
Get ready to #LiveTheInfinite.
Know More: https://t.co/fZ6SLmV9YO pic.twitter.com/syO2tI6bs3
— OPPO India (@oppomobileindia) January 16, 2021
ओप्पो रेनो 5 प्रो 5 जी स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा फुल-एचडी + (1,080x2,400 पिक्सेल) ओईएलईडी डिस्प्ले असणार आहे. ज्यामध्ये 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 92.1 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि 420 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी असेल. मीडियाटेक डायमेन्शन 1000+ प्रोसेसरसह सज्ज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये एआरएम जी 77 एमसी 9 जीपीयू असणार आहे.
ओप्पो रेनो 5 प्रो 5 जी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारीत कलर ओएस 11.1 वर कार्य करेल. हा स्मार्टफोन ऑरोरा ब्लू, मूनलाईट नाईट आणि स्टाररी नाईट असे तीन रंगांत उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप व्यतिरिक्त, 64-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि दोन 2-मेगापिक्सेल सेंसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 हजार 350 एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश आहे.