Hike Stickers (Photo Credits-File Image)

सोशल मीडियात सध्या मॅसेजिंग अॅप हाइक (Hike) संबंधित जोरदार चर्चा सुरु आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसीमुळे लोग सिग्नल आणि टेलिग्रामकडे वळत आहेत. परंतु याच दरम्यान भारतीय निर्मित अॅप हाइक हे आता बंद करण्यात आले आहे. हाइक मॅसेंजर बंद झाले आहे असून ते प्ले स्टोर येथून ही हटवण्यात आले आहे. जे लोक या अॅपचा वापरत करत होते आणि चॅट करताना स्टिकर्स सुद्धा पाठवत होते त्यांना हे अॅप सुरु करावे असे वाटत आहे. बहुतांश हाइक युजर्सकडून ट्विटवर अॅप बंद झाल्याने इमोशनल ट्विट्स दिसून आले.

कंपनीच्या सीईओ यांनी नुकत्याच एका व्हिडिओनुसार, भारतीय अॅप हाइक 15 जानेवारी पासून बंद झाल्याचे म्हटले होते. सीईओ कविन भारती मित्तल यांनी ट्विट करत याची पुष्टी केली होती. त्यांनी असे म्हटले की, हाइक स्टिकर चॅट सेवा बंद करणार आहे. तर आपल्या बाकी सेवांव हाइक इमोजी असणार आहे. अॅप तेवढे यशस्वी झाले नाही जेवढी त्याची अपेक्षा होती. याच पार्श्वभुमीवर आता युजर्सने मजेशीर मिम्स आणि जोक्स ट्विटरवर केले असून ते तुफान व्हायरल होत आहेत.(यूजर्संच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर WhatsApp ने नवीन Privacy Policy तीन महिन्यांसाठी पुढे ढकलली)

 Tweet:

 Tweet:

 Tweet:

 Tweet:

दरम्यान कंपनीने याच्या ऐवजी हाइक द्वारे आपले दोन अॅप वाइब (Vibe) वर लक्ष केंद्रित करणार आहे. जे आधी हाइकलँन्ड आणि रश च्या रुपात संदर्भित केले होते. तुमचा सर्व डेटा अॅप डाऊनलोड केल्यानंतर उपलब्ध होणार आहे. तुम्हाला हाइकमोजी वाइब आणि रश दोन्ही मध्ये उपलब्ध असणार आहे. आयओएसवर सुरु करण्यात आलेली रश सेवा युजर्सला सेल्फी अवतार तयार करण्यासाठी आणि कॅरम, लुड सारखे अन्य गेम खेळण्याची परवानगी देणार आहे.

हाइक स्टिकर चॅट अॅप एप्रिल 2019 मध्ये 40 भारतीय भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक स्टिकर्ससह लॉन्च केला होता. डिसेंबर पर्यंत अॅपकडे दोन मिलियन हून अधिक आठवडाभरचे अॅक्टिव्ह युजर्स होते आणि मित्तलने 2020 मध्ये HikeMoji आणि HikeMoji स्टिकरच्या आसपास वर्च्युअल फायनान्स तयार करुन HikeMoji आणि HikeMoji ची पुष्टी केली.