ओप्पो कंपनीकडून आपला नवा स्मार्टफोन A93s 5G चीनमध्ये लॉन्च केला आहे. खासियत अशी आहे की, या एन्ट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये 90Hz चा डिस्प्ले, 48 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ओप्पो A93s 5G सिंगल वेरियंट 8GB+265GB मध्ये येणार आहे. त्याची किंमत CNY 1999 (जवळजवळ 23, हजार रुपये) आहे. ग्राहकाला हा फोन तीन कलर वेरियंट व्हाइट पीच सोडा, समर नाइट गॅलेक्सी आणि अर्ली समर गुआंघाई रंगात खरेदी करता येणार आहे. तर जाणून घ्या किंमतीच्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक माहिती.
ओप्पो A93s 5G मध्ये 6.5 इंचाचा एक फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेजॉल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. स्क्रिनचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज असून त्याचा पीक ब्राइटनेस 600 मिनिट्स आहे. ओप्पोचा नवा फोन कंपनीने गेल्या वर्षात लॉन्च केलेल्या A93 5G सारखाच आहे. तर ओप्पो ए93 एस 5जी फोनमध्ये मेडियाटेक डाइमेंसिटी 700 चिपसेट दिला गेला आहे. या फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदीने वाढवता येणार आहे.(मोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक)
कंपनीचा हा स्मार्टफोन बेस्ड कलर OS 11.1 सह येणार आहे. कॅमेऱ्याच्या आधारावर ओप्पो ए93एस मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. त्याचसोबत यामध्ये 2 मेगपिक्सलची पोर्ट्रेट लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर दिला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन फिंगरप्रिंट स्कॅनरसह येणार आहे. यामध्ये फेस अनलॉक फिचर सुद्धा दिला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली असून जी18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे.