मोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

Amazon Prime Day Offer: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India च्या Amazon Prime Day Sale ची सुरुवात 26 जुलै पासून होणार आहे. हा दोन दिवसांचा सेल असून यामध्ये विविध प्रोडक्ट्सवर भरघोस सूट दिली जाणार आहे. सेलमध्ये स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ऑफरचा फायदा तुम्हाला घेता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर अॅमेझॉनकडून एक कॉन्टॅस्ट सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार OnePlus साठी लेटेस्ट लॉन्च स्मार्टफोन OnePlus 9R 5G मोफत दिला जाणार आहे. याची किंमत 39,999 रुपये आहे. दरम्यान हा फोन तुम्हाला मोफत मिळवण्यासाठी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. याबद्दल अॅमेझॉन इंडियाच्या ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे.

OnePlus 9R 5G स्मार्टफोन मोफत मिळवण्यासाठी आज (25 जुलै) दुपारी 2 वाजता लाइव्ह होणार आहे. फोनसाठी युजरला Amazon India च्या ट्विट मध्ये कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. तर जाणून घ्या कसा फ्री मध्ये मिळू शकतो तुम्हाला स्मार्टफोन.(Flipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट)

-OnePlus 9R 5G फोन मिळवण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे अनिवार्य आहे.

-तसेच युजरचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावी.

-2 लकी विजेत्यांना मोफत OnePlus 9R स्मार्टफोन दिला जाणार आहे.

-प्रत्येक एका विजेत्याला फक्त एकच बक्षिस मिळण्यास पात्र ठरणार आहे.

-विजेत्यांची नावे Amazon India च्या ट्विटर हँडलवर 5 ऑगस्ट रोजी डिस्प्ले केले जाणार आहे.

OnePlus 9R मध्ये 6.5 इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला गेला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटसह येणार आहे. हा स्मार्टफोन ऑक्टाकोर Snapdragon 870 प्रोसेसवर काम करणार आहे. पॉवर बॅकअपसाठ 4500mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी सेंसर 48MP चा आहे. तर 16MP चा अल्ट्रा वाइड सेंसर, 5MP ची मॅक्रो शूटर, 2MP चा मोनोक्रोम शूटर दिला आहे. सेल्फीसाठी OnePlus 9R मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.