Flipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट
Flipkart Big Saving Days (Photo Credits-Twitter)

Flipkart Big Saving Days 2021 Sale आजपासून फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी सुरु झाला आहे. तर आज रात्री पासून हा सेल सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असून येत्या 29 जुलै पर्यंत तो असणार आहे. या सेलदरम्यान ग्राहकांना मोबाईल फोन, लॅपटॉप, स्पीकर, स्मार्टवॉच आणि दुसऱ्या काही इलेक्ट्रॉनिक्सवर ऑकर्षक ऑफर, डिस्काउंट मिळणार आहे. याच कारणास्तव आज आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये उत्तम डिल्ससह ऑफर्स बद्दल अधिक सांगणार आहोत.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये iPhone Mini आणि iPhone 12 ची कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. खरंतर आयफोन मिनी 64GB रॅम असलेला तुम्हाला 69,900 रुपयांऐवजी 57,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच आयफोन 12 हा तुम्हाला 67,999 रुपयांना मिळणार आहे. मुख्य बाब म्हणजे दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीसाठी जर तुम्ही ICICI बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. आयफोन व्यतिरिक्त ग्राहकांना मोटोरोला, असूस,रिअलमीसह आणखी स्मार्टफोनच्या ब्रँन्डवर धमाकेदार ऑफर मिळणार आहे.(OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत)

Flipkart Big Saving Days (Photo Credits-Twitter)

तसेच जर तुम्हाला GoPro 9 सेलदरम्यान 37,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ICICI बँकेच्या कार्डधारकांना 10 टक्के सूट दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त नोकिया मीडिया स्ट्रिमर  सध्या 1899 रुपयांना विक्री केला जात आहे. कॉम्पॅक्ट स्ट्रिमिंग स्टिक अॅन्ड्रॉइड टीव्ही 9.0 वर चालतो. यासाठीच क्रोमकास्ट स्ट्रिमिंग आणि गुगल असिस्टंटला सुद्धा सपोर्ट करणार आहे.