OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
OnePlus Nord 2 5G (Photo Credits: OnePlus)

वनप्लस (OnePlus) ने अखेर बहुप्रतिक्षित असा नॉर्ड 2 5जी (Nord 2 5G) स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. ओरिजनल नॉर्ड (Original Nord) आणि नॉर्ड सीई (Nord CE) नंतर देशातील चीनी ब्रँडचे हे तिसरे नॉर्ड डिव्हाईस आहे. 26 जुलै पासून हा स्मार्टफोन Red Cable Club साठी उपलब्ध होईल. इतरांसाठी हा फोन 28 जुलैपासून वनप्लसच्या अधिकृत वेबसाईट आणि अमेझॉन वेबसाईटवर (Amazon.in) उपलब्ध असेल. वनप्लस नॉर्ड 2 5जी सोबत कंपनी 3 महिन्यांचा Spotify Premium फ्री मध्ये देत आहे. सध्या या स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डर्स युरोपमध्ये घेतल्या जात असून 28 जुलैपासून युरोपमध्ये ओपन सेलद्वारे हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.

OnePlus Nord 2 5G मध्ये 3 स्टोरेज कॉन्फ्रिग्रेशन देण्यात आलं आहे.- 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 12GB + 256GB. 6GB + 128GB वेरिएंटची किंमत 27,999 रुपये इतकी असून 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. तर 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 34,999 रुपये इतकी आहे.

OnePlus India Tweet:

OnePlus Nord 2 5G (Photo Credits: OnePlus)

हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे. Blue Haze, Green Woods आणि Gray Sierra. लॉन्च ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन खरेदी करताना एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड किंवा ईएमआयचा पर्याय निवडल्यास 1000 रुपयांचा इंस्टट डिस्काऊंट मिळत आहे. त्याचबरोबर 6 महिन्यांचा नो-कास्ट ईएमआय देखील उपलब्ध आहे. वनप्लस नॉर्ड 2 5जी स्मार्टफोन मध्ये 6.43 इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि  2400x1080 पिक्सल्ससह देण्यात आला आहे.

यात MediaTek Dimensity 1200 AI SoC प्रोसेसर ARM G77 MC9 GPU सह देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल कॅमेरा देण्यात आला असून 50MP चा प्रायमरी सेन्सर, 8MP चा अल्ट्रा वाईड एंगल लेन्स आणि 2MP चा मोनो लेन्स देण्यात आली आहे. यात सेल्फी आणि व्हि़डिओ कॉलिंगसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 11 वर आधारित OxygenOS 11.3 वर कार्यरत आहे. यात 4500mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.