गेल्या 2 आठवड्यांपूर्वी बाजारात आलेला ओप्पो के3 (Oppo K3) स्मार्टफोनचा आज अॅमेझॉनवर (Amazon India) फ्लॅश सेल (Flash Sale) होणार आहे. पॉप अप सेल्फी कॅमेरा फिचर हे या स्मार्टफोनचे सर्वात आकर्षक फिचर आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर हा फ्लॅशसेल सुरु होईल. भारतात Oppo K3 मोबाईल 6GB वेरियंट 16,990 रुपयांत उपलब्ध आहे. तर 8GB वेरियंटची किंमत 19,990 रुपये आहे. यात अॅमेझॉन पे चा पर्याय वापरल्यास फोनवर तुम्हाला 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. तर अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांनाही 1000 रुपयांची सवलत आहे. यात रिलायन्स जिओने देखील विशेष ऑफर दिली आहे. जिओकडून 7050 रुपयांचे वाउचर देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर लेंसकार्टवर 5000 रुपयांचे आणि ओयोवर 12,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. त्याशिवाय फोन नो कॉस्ट इएमआयवर देखील उपलब्ध आहेत.
काय आहेत या स्मार्टफोनची वैशिष्टये:
Oppo K3 हा स्मार्टफोन 6.5 इंचाचा असून यात एचडी+ऐमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्युशन 1080x2340 पिक्सेल आणि याचा रेश्यो 19:5:9 इतका आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर देण्यात आला आहे.
हेही वाचा- Oppo A5s भारतात लॉन्च, 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमती मधील स्मार्टफोनमध्ये मिळणार दमदार फिचर्स
ह्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप (Dual Rear Camera) देण्यात आले आहे. तसेच 16 मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सेल सेंकडरी डेप्थ सेंसरचाही समावेश आहे. फोनच्या समोरील बाजूस 16 मेगापिक्सेलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा (Pop up Selfie Camera) देण्यात आला आहे.
या फोनमध्ये फुल एचडी स्क्रीन, ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर, 8GB रॅम आणि ड्यूअल कॅमेरासारखे फिचर्स आहेत. तर 128GB अंतर्गत स्टोरेजसह 3,765mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.