EMI च्या नावाखाली ऑनलाईन लूट होतेय, खातेधारकांना बँकांकडून सुचना
OTP Fraud (Photo Credits: Pixabay)

देशभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. तर लॉकडाउनच्या काळात आरबीआयने तीन महिने म्हणजेच 31 मार्च ते 31 मे पर्यंत कोणत्याही प्रकारचे पेमेंट, लोन किंवा क्रेडिट कार्डचे बिल किंवा ईएमआय वसूल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही सुचना लक्षात घेणे महत्वाचे आहे. कारण सध्या ईमआयच्या नावाखाली खातेधारकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने ग्राहकाने सावध रहावे अशी सुचना बँकेकडून देण्यात आली आहे. देशात HDFC,ICICI, SBI सह अन्य बड्या बँका असून लॉकडाउनच्या काळात फसवणूकदार ग्राहकांना ईएमआय बाबत फोन करुन लूटमार करु शकतात.

ग्राहकांना लूटण्यासाठी फसवणूक करणारी व्यक्ती स्वत:ला बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून देतो. त्यानंतर फोनवरील व्यक्ती तुम्हाला ईएमआय संबंधित काही माहिती सांगत त्याबद्दल अधिक विचारणा करतो. ऐवढेच नाही फोनवरील व्यक्ती खरच बँक कर्मचारी असल्याचे दाखवत ग्राहकाला नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांकबद्दलची माहिती वेरिफिकेशनसाठी देण्यासाठी सांगतो. तसेच ग्राहकाला क्रेडिट, डेबिट किंवा ईएमआयमध्ये दिलासा देणाऱ्या काही गोष्टी सांगतो. फोनवरील व्यक्ती त्यानंतर मोबाईल क्रमांकावर एक फॉर्म पाठवून त्यात कार्ड क्रमांक आणि अन्य बँक खात्यासंबंधित माहिती देण्यास सांगतात. फॉर्म भरुन दिल्यावर तुम्हाला एक OTP विचारला जाईल. मात्र जर तुम्ही हा ओटीपी फोनवरील व्यक्तीला सांगितल्यास खात्यामधील रक्कम काढली जाऊन तुमची फसवणूक होऊ शकते.(Fake Alert: सरकारकडून तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स वाचले जातायत? जाणून व्हायरल होणाऱ्या मेसेज मागील सत्य)

त्यामुळे जर तु्म्हाला बँक कर्मचाऱ्याच्या नावाने फोन आल्यास बँक खात्यासंबंधित अधिक माहिती देण्यापूर्वी विचार करा. तसेच फोनवर आलेला ओटीपी सुद्धा कोणासोबत शेअर करु नका अशा सुचना सुद्धा वारंवार बँकेकडून देण्यात येते. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या फसवणूकीपासून बचाव करण्यासाठी खातेधारकांनी बँकांकडून दिलेल्या सुचनांचे पालन करावे.