OnePlus 8T (Photo Credits: OnLeaks)

वनप्लस (OnePlus) कंपनीने व्हॅलेन्टाईन डे निमित्त आपल्या विविध प्रॉडक्ट्सवर स्पेशल डिल्स (Special Deals) आणि डिस्काऊंट (Discount) घोषित केला आहे. यामध्ये वनप्लस स्मार्टफोन, वनप्लस बँड (OnePlus Band), वनप्लस टीव्ही (OnePlus TV) आणि वनप्लस पावर बँक (OnePlus Power Bank) यांच्यावर सूट मिळणार आहे. या डिस्काऊंट ऑफर्स 10 मार्चपर्यंत उपलब्ध असून emi चा वापर करुन देखील तुम्ही हे प्रॉडक्ट्स विकत घेऊ शकता. या ऑफर्स अॅमेझॉन (Amazon) आणि वनप्लस.इन (Oneplus.in) वर उपलब्ध आहेत.

वनप्लस 8 टी 5 जी हा स्मार्टफोन केवळ 42,999 रुपयांना उपलब्ध असून SBI क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 3000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. वनप्लस 8 प्रो हा स्मार्टफोन 54,999 रुपयांना उपलब्ध असून तुम्ही 18 महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआय हा पर्याय देखील निवडू शकता. वनप्लस 8 स्मार्टफोनच्या 6जीबी व्हेरिंएटची किंमत 39,999 इतकी असून एसबीआय कार्डने खरेदी केल्यास 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. वनप्लस नॉर्ड हा स्मार्टफोन सुद्धा एसबीआय कार्ड ने खरेदी केल्यास 1500 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो.

OnePlus Q1 Pro TV हा स्मार्ट टीव्ही वनप्लसच्या ऑनलाईन स्टोअर सोबतच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. हा टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 5000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. वनप्लस Y सिरीजच्या 32 इंच टीव्हीवर एसबीआय क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 1500 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. (OnePlus Buds Z Steven Harrington ची लिमिटेड एडिशन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)

OnePlus Band तुम्हाला 2499 रुपयांना विकत घेता येईल. OnePlus Buds, BudsZ, Oneplus BWZ Bass Edition या हेडफोन्सवरती 5 टक्के डिस्काऊंट मिळू शकतो. ही ऑफर सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. वनप्लस पॉवर बँक 888 रुपयांना उपलब्ध असून ही ऑफर फक्त रेड केबल क्लब मेंबर्ससाठी आहे.