OnePlus Buds Z Steven Harrington ची लिमिटेड एडिशन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus Buds Z Steven Harrington (PC -IANS)

OnePlus Buds Z Steven Harrington: वनप्लसने आज 25 जानेवारी 2021 रोजी भारतात वनप्लस बड्स झेड स्टीव्हन हॅरिंग्टन (OnePlus Buds Z Steven Harrington) लिमिटेड एडिशन लाँच केले आहे. या इअरबड्सची रचना लास एंजेलिसमधील कलाकार आणि डिझायनर हॅरिंगटन यांनी केली आहे. याची किंमत 3,699 रुपये आहे. हे इअरबड्स OnePlus.in आणि OnePlus Store App वर विक्रीसाठी उपलब्ध असतील. 25 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून रेड केबल क्लबचे सदस्यांना इयरफोन खरेदी करता येतील. इयरबड्सची खुली विक्री OnePlus.in, OnePlus स्टोर अॅप, Amazon India, Flipkart.com आणि OnePlus ऑफलाइन स्टोअरवर 27 जुलै 2021 पासून विक्रीसाठी उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन्स -

वनप्लस इअरबड्स दोन टोन पर्पल आणि मिंट कलर कॉम्बो चार्जिंगसह येणार आहेत. तसेच केसवर पेंट जॉब उपलब्ध असेल. इअरबड्समध्ये 10 मिमी डायनॅमिक ड्राइव्हर आहे, जो 3 डी स्टीरिओ चालित Dolby Atmos सह येईल. ईरबड्स एकदा चार्जिंग केल्यानंतर 20 तासांपर्यंत वापरले जाऊ शकतात. ते चार्जिंगच्या 10 मिनिटांत 3 तास संगीत ऐकण्यास सक्षम असतील. Buds Z इयरबड्स मध्ये IP55 रेटिंग आहे, त्यामुळे इअरबड्स लवकरचं पाण्यात आणि धूळीत खराब होणार नाहीत. कनेक्टिव्हिटीसाठी वनप्लस बड्स झेडमध्ये ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी आहे. याशिवाय इयरबड्समध्ये वातावरणाचा आवाज कमी करणे, क्विक पेयर, क्विक स्विच ही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. (वाचा - Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोनचा भारतात आज पहिला सेल; जाणून घ्या किंमत आणि खास ऑफर्स)

वनप्लसच्या इतर इअरबड्स भारतात लाँच -

यापूर्वी वनप्लसने भारतात OnePlus Buds Z TWS Earbuds आणि OnePlus Bullets Wireless Z ही दोन नवीन उत्पादने भारतात लाँच केली होती. OnePlus Buds Z भारतात 3,190 रुपयांच्या किंमतीसह लाँच करण्यात आले आहे. हे डिव्हाइस राखाडी आणि पांढर्‍या रंगाच्या रूपांमध्ये उपलब्ध असेल. OnePlus Bullets Wireless Z एडिशनची किंमत 1,999 रुपये आहे. हे बेस ब्लू आणि रिवर्ब रेड कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.

OnePlus Buds Z हे डिव्हाइस आयपी 55 रेट केलेले आहे. जे धूळ आणि घामापासून संरक्षण करते. हे डिव्हाइस सिलिकॉन बॉडीपासून बनलेले असून यात नॉइस कँसिलेशनचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामध्ये देण्यात आलेली बॅटरी एका चार्जमध्ये 20 तासांचा बॅकअप देण्यास सक्षम आहे. बॅटरी वेगवान चार्जिंग सपोर्टसह येते. याशिवाय यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे.