Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोनचा भारतात आज पहिला सेल; जाणून घ्या किंमत आणि खास ऑफर्स
Oppo Reno 5 Pro 5G (PC - Twitter)

Oppo Reno 5 Pro 5G: ओप्पोचा लेटेस्ट स्मार्टफोन Reno 5 Pro 5G चा आज भारतात पहिला सेल आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आज दुपारी 12 वाजता या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे. या स्मार्टफोनवर ग्राहकांना बम्पर कॅशबॅक तसेच आकर्षक डील्स मिळणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये ओएलईडी डिस्प्लेसह एकूण पाच कॅमेरे आहेत.

Oppo Reno 5 Pro 5G किंमत -

कंपनीने Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोनची किंमत 35,990 रुपये ठेवली आहे. या किंमतीवर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिंअट उपलब्ध असतील. हा स्मार्टफोन अ‍ॅस्ट्रल ब्लू आणि स्टीरी ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर एचडीएफसी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक आणि झेस्ट मनीच्या ग्राहकांना Reno 5 Pro 5G खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक देण्यात येईल. या व्यतिरिक्त ग्राहकांना हे डिव्हाइस नो-कॉस्ट EMI खरेदी करता येईल. (वाचा - Infinix Hot 10 Play स्मार्टफोन लॉन्च; 6000 mAh बॅटरी आणि Helio G25 SoC प्रोसेसर सह काय आहेत फिचर्स? जाणून घ्या)

Oppo Reno 5 Pro 5G फिचर्स -

Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा एफएचडी + ओएलईडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1,080 x 2,400 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रथम 64 एमपी प्राइमरी सेन्सर, दुसरा 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, तिसरा 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि चौथा 2 एमपी मोनो पोर्ट्रेट लेन्स आहे. तसेच, डिव्हाइसच्या पुढील बाजूस 32 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने मीडियाटेक डायमेन्सिटी 1000+ प्रोसेसर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना 4,350mAh बॅटरी 65W सुपरव्हीओसी 2.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. याशिवाय हँडसेटमध्ये 4 जी एलटीई, ड्युअल बँड वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.1 आणि यूएसबी टाइप-सी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. (वाचा - Republic Day Sale 2021: अॅपल iPhone 12 सिरीज 48,900 रुपयांपासून IndiaiStore वर उपलब्ध; जाणून घ्या आकर्षक ऑफर्स)

ओप्पोने गेल्या वर्षी Oppo Reno5 Pro+ 5G जी स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत 3,999 चिनी युआन (सुमारे 45,000 रुपये) आहे. Oppo Reno5 Pro+ 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आउट-ऑफ-बॉक्सवर आधारित कलरओएस 11 वर कार्य करतो. या स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा एफएचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 90 हर्ट्झ आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आहे.

ओप्पोने आपल्या नवीन Oppo Reno5 Pro+ 5G मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 50 एमपी सोनी आयएमएक्स 766 सेन्सर, 8 एमपी अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स, 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी मोनो पोर्ट्रेट लेन्सचा समावेश आहे. तसेच, डिव्हाइसच्या पुढील बाजूस 32 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.