OnePlus 8 & OnePlus 8 Pro (Photo Credits: OnePlus India)

चायनीज कंपनी वनप्लस यांनी अलिकडेच OnePlus 8 सिरिज लॉन्च केली आहे. याचे प्री बुकींग 29 एप्रिल मध्यरात्री पासून सुरु करण्यात आले आहे. यामध्ये OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro खरेदी करण्यास इच्छुक असणारे 1000 रुपये देवून प्री बुकींग करु शकतात. ही प्री बुकींग केवळ अॅमेझॉन इंडियावरच उपलब्ध आहे. OnePlus 8 सिरीजची प्री बुकींग करणाऱ्यांना अजून 1000 रुपयांचा अॅमेझॉन पे बॅलन्स जिंकण्याची संधी आहे.

OnePlus 8 स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाचा AMOLED डिस्प्ले असून 90 हर्ट्सचा रिप्रेश रेट आहे. त्याचप्रमाणे स्क्रिन रेजोलूशन 2400 x 1080 पिक्झल्स आहे. तर आसेप्ट रेशो 20:9 इतका आहे. यामध्ये क्वालकॉम स्पॅन ड्रॅगन 865 चिपसेट असून X55 5G मॉडम आहे. या चिपसेटसोबत 12 GB रॅम दिला असून 256 GB इंटरनल स्टोरेज दिला आहे. या मोबाईमध्ये 4300 mAh ची बॅटरी असून फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या मोबाईलमध्ये ट्रीपल रिअल कॅमेरा असून लेन्स 48 मेगापिक्सल, 16 मेगापिक्सल, 2 मेगापिक्सल अशा आहेत. तर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus India Tweet:

OnePlus 8 चे प्री बुकींग Amazon India वर कसे कराल?

स्टेप 1- सर्वप्रथन अॅमेझॉनच्या वेबसाईटमध्ये वनप्लस 8 सिरीजच्या ईमेल गिफ्ट कार्ड पेजमध्ये जावे लागेल.

स्टेप 2- त्यानंतर तुम्हाला 1000 रुपये सिलेक्ट करुन वनप्लसचे गिफ्ट कार्ड 29 एप्रिल ते 10 मे दरम्यान विकत घ्यावे लागतील.

स्टेप 3- पेमेंट झाल्यावर तुमच्या ईमेलवर गिफ्ट कार्ड येईल. मेलमध्ये असलेल्या लिंक द्वारे तुम्ही कुपन क्लेम करु शकता.

स्टेप 4- त्यानंतर 11 मे ते 30 जून दरम्यान तुम्हाला वनप्लस 8 किंवा वनप्लस 8 प्रो स्मार्टफोन खरेदी करायचा आहे.

स्टेप 5- ऑर्डर प्लेस केल्यानंतर तुम्हाला 30 दिवसांच्या आत अॅमेझॉन पे मध्ये 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

वनप्लस 8 च्या 6 GB रॅम + 128 GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 41999 आहे. तर 8GB+128GB ची किंमत 44999 आहे. वनप्लस 8 प्रो च्या 8 जीबी वेरिंएटची किंमत 54999 असून 12 जीबी वेरिंएटची किंमत 59999 इतकी आहे.