ATM: डेबिट कार्ड नसतानाही आता एटीएममधून काढता येणार पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

एनसीआर कॉर्पोरेशनने (NCR) भारतात यूपीआय इनेबल्ड इंटर ऑपरेबल कार्डलेस कॅश विद ड्रॉइंग सिस्टम (ICCW) लॉन्च केले आहे. ज्यामुळे एटीएममधून (ATM) पैसे काढण्यासाठी बॅंक खातेदारांना डेबिड कार्डची (Debit Card) गरज भासणार नाही. यापुढे यूपीआय अॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करून एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. सिटी युनिन बँकेने ही नवीन सुविधा सुरू करण्यासाठी एनसीआरशी हातमिळवणी केली आहे. बँकेने क्यूआर कोड आधारित इंटरऑपरेबल कार्डलेस कॅशलेस सुविधेस अनुमती देण्यासाठी आधीच त्यांनी 1 हजार 500 एटीएम अपग्रेड केले आहे.

सिटी युनियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एन. कामकोडी म्हणाले की, आम्ही आयसीसीडब्ल्यू समाधान वितरित करण्यासाठी एनसीआरशी भागीदारी केली आहे, ज्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना पुढील पिढीचे निराकरण करण्यात मदत होईल. हे यूपीआय क्यूआर कोड वापरुन आमच्या एटीएममधून रोख पैसे काढू शकतात. हे देखील वाचा- Sony लॉन्च करणार नवा Xperia स्मार्टफोन, येत्या 14 एप्रिलला आयोजित करणार कार्यक्रम

विना डेबिड कार्ड एटीएमधून पैसे काढण्यासाठी वापरकर्त्यांना त्याच्या स्मार्टफोमध्ये असलेले यूपीआय अॅप उघडणे गरजेचे आहे. त्यानंतर एटीएमच्या स्क्रिनवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. वापरकर्त्यांना स्क्रीनवर क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल आणि त्यांच्या मोबाइल फोनद्वारे रोख पैसे काढणे अधिकृत करावे लागेल. व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी, क्यूआर कोड सतत बदलला जाईल. वापरकर्ते 5 हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहे.