Gmail New Feature: आता एका क्लिकवर डिलीट होणार अनावश्यक ईमेल, Google ने आणलं 'हे' खास फीचर
Gmail (PC - Wikipedia)

Gmail New Feature: तुम्हाला यापुढे Gmail वर येणार्‍या स्पॅम संदेशांची काळजी करण्याची गरज नाही. Google Android वर Gmail मध्ये नवीन फीचर आणणार आहे. Google लवकरच Gmail मध्ये 'Select All' पर्याय उपलब्ध करून देणार आहे. नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स एकाच वेळी संपूर्ण इनबॉक्स मेसेज डिलीट करू शकतील. हे वैशिष्ट्य वेब अॅपवर आधीपासूनच आहे. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही अनावश्यक स्पॅम Gmail क्षणार्धात हटवू शकाल.

एका रिपोर्टनुसार, युजर्सना लवकरच हे फीचर दिसायला सुरुवात होईल. तुम्हाला हे फीचर वापरायचे असल्यास, Google Play Store ला भेट द्या आणि अॅप अपडेट करा. एकदा अॅप अपडेट झाल्यानंतर, तुम्हाला एक नवीन वैशिष्ट्य दिसेल. (हेही वाचा -WhatsApp UPI Payment: व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आता फक्त चॅटच नाही तर, करता येणार युपीआय पेमेंटही; Meta ने व्यवसायासाठी सुरु केली नवीन सर्व्हिस)

जीमेलमध्ये 'सिलेक्ट ऑल' फीचर कसे वापरावे -

  • Android फोन असलेले लोक त्यांच्या इनबॉक्समधील अनावश्यक ईमेल सहजपणे हटवू शकतात.
  • सर्वप्रथम तुमचा Gmail एकदा अपडेट करा आणि तुमच्या Android फोनवर Gmail अॅप उघडा.
  • आता, तुमच्या इनबॉक्समधील ईमेलपैकी एकावर टॅप करा.
  • आता, सर्व ईमेल निवडण्यासाठी शीर्षस्थानी दिसणारा चेकबॉक्स निवडा.
  • येथे तुम्ही 50 पर्यंत ईमेल निवडू शकता.
  • सर्व निवडलेले ईमेल हटवण्यासाठी हटवा बटणावर टॅप करा.
  • संपूर्ण Gmail साफ करण्यासाठी तुम्ही ही प्रक्रिया पुन्हा सुरू करू शकता.

दरम्यान, यापूर्वी वापरकर्ते एकाच वेळी 50 ईमेल डिलीट करू शकत होते. Gmail मध्ये एकाच वेळी 50 हून अधिक ईमेल हटवण्यासाठी, संगणकावर तुमच्या Gmail खात्यात लॉग इन करा, त्यानंतर सर्व दृश्यमान संदेश निवडण्यासाठी ईमेलच्या सूचीच्या वरच्या चेकबॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर, फोल्डरमधील प्रत्येक ईमेल निवडण्यासाठी 'सर्व संभाषणे निवडा' या पर्यायावर क्लिक करा आणि 'डिलिट बटणावर क्लिक करा.