Nokia ने लॉन्च केला 75 इंचाचा 4K UHD स्क्रिन टीव्ही, जाणून घ्या किंमतीसह खासियत
प्रतिकात्मक फोटो ( फोटो सौजन्य- Pixabay )

नोकिया यांनी त्यांचा स्मार्ट टीव्ही रेंज मध्ये 75 इंचाचा मॉडेल उपलब्ध करुन दिला आहे. हा नवा स्मार्ट टीव्ही नोकियाने लायसेन्स असणारी StreamView यांनी युरोपात लॉन्च केला आहे. नव्या नोकिया स्मार्ट टीव्हीच्या 75 इंचाच्या मॉडेलमध्ये HDR10 सपोर्टसह 4K UHD रेजॉल्यूशन स्क्रिन दिली आहे. टीव्ही मध्ये व्यूइंग एक्सपीरिंग वाढवण्यासाठी डॉल्बी विजन सपोर्ट दिले गेले आहे. 75 इंच मॉडेल व्यतिरिक्त StreamView ने नोकिया स्मार्ट टीव्ही 32 इंच, 43 इंच, 50 इंच, 55 इंच आणि 65 इंच मॉडेल्स युरोपीय मार्केटमध्ये उतरवला आहे. या व्यतिरिक्त कंपनीने 4K UHD रेज्यॉल्यूशनसह 58 इंचाचा नोकिया स्मार्ट टीव्ही आणला आहे.

नोकिया स्मार्ट टीव्ही 75 इंचाच्या मॉडेलची किंमत 1399 युरो म्हणजेच 1,23,300 रुपये आहे. नव्या मॉडेलची विक्री निवडक युरोपीय मार्केट्समध्ये 1 डिसेंबर पासून StreamView च्या माध्यमातून सुरु होणार आहे. फ्लिपकार्टने गेल्या महिन्यात भारतात नोकिया स्मार्ट टीव्ही 32 इंच एचडी रेडी, नोकिया स्मार्ट टीव्ही 50 इंच 4K, नोकिया स्मार्ट टीव्ही 55 इंच 4K आणि नोकिया स्मार्ट टीव्ही 65 इंच 4K मॉडेल्स लॉन्च केले होते.(Nokia 2.4 स्मार्टफोन भारतात लॉन्च, 4500mAh च्या दमदार बॅटरीसह मिळणार 'हे' फिचर्स)

नोकियाच्या 75 इंचाच्या मॉडेल अॅन्ड्रॉइड टीवी 9.0 वर चालणार आहे. टीव्हीमध्ये 4K UHD डिस्प्ले पॅनल दिला आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 3840X160 पिक्सल आहे. टीवी डॉल्बी विजन आणि HRD10 ला सपोर्ट करणार आहे. टीव्हीमध्ये 12 वॅटचे दोन स्पीकर्स दिले आहेत. जे डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस सराउंड साउंड टेक्नॉलॉजी लेस आहे. या टीव्हीमध्ये क्वाड-कोर ARM-CA55 प्रोसेसर दिला आहे. टीव्हीमध्ये 1.5GB रॅम आणि 8GB इनबिल्ड स्टोरेज दिला आहे.