Nokia C12 Plus भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरंच काही

Nokia C12 Plus Price in India: नोकिया सी12 आणि नोकिया सी12 प्रो भारतात लॉन्च केल्यानंतर कंपनीने आता नोकिया सी12 प्लस (Nokia C12 Plus) सुद्धा भारतीय बाजारात उतरवला आहे. नव्याने लाँच झालेल्या स्मार्टफोनच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये (Nokia C12 Plus Features) त्याचा 6.3-इंचाचा डिस्प्ले, 4,000 mAh बॅटरी आणि 32GB अंतर्गत (इंटर्नल) स्टोरेज यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाला असला तरी तो अद्याप खरेदीसाठी उपलब्ध नाही. तसेच, वाचकांच्या माहितीसाठी असे की, नोकियाने भारतात स्मार्टफोनच्या विक्रीची तारीखही अद्याप जाहीर केलेली नाही. जाणून घ्या Nokia C12 Plus च्या किमत फीचर्स आणि इतर बऱ्याच गोष्टींविषयी.

भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेल्या नोकीयाच्या नोकिया सी12 आणि नोकिया सी12 प्रो बद्दल सांगायचे दोन्ही फोनची विविध संकेतस्थळावर उपलब्ध असलेली किंमत अनुक्रमे 6,599 आणि 6,999 रुपये इतकी आहे.

नोकिया C12 प्लस किंमत आणि रंग

Nokia C12 भारतात एकाच स्टोरेज प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. जो 2GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज देतो. भारतात या मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे. वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन आपल्याला लाइट मिंट, काळ्या आणि गडद निळसर रंगांमध्ये मिळू शकतो. (हेही वाचा, Twitter Free Blue Tick: ट्विटर 10 हजार यूजर्संना देणार मोफत ब्लू टिक; कोणत्या अकाऊंटला मिळणार ही सुविधा? जाणून घ्या)

Nokia C12 Plus फिचर्स

Nokia C12 Plus मध्ये खालील फिचर्स मिळतात

  • 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले (720 X 1520-पिक्सेल रिझोल्यूशनसह)
  • प्लास्टिकची बॉडी (मागील बाजूस वरच्या डाव्या कोपर्यात एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल)
  • नॉचसह डिस्प्ले वॉटरड्रॉप (फ्रंट कॅमेऱ्यासह)
  • 2GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज (मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढ शक्य)
  • सिंगल 8MP रियर कॅमेरा
  • सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, यात 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा

दरम्यान, स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल सांगायचे तर Nokia C12 Plus मध्ये 4,000 mAh ची बॅटरी आहे. जी मायक्रो-USB पोर्टच्या मदतीने चार्ज केली जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ड्युअल सिम, 4G VoLTE, WiFi, ब्लूटूथ, GPS आणि इतरही बरेच काही पर्याय आहेत.